Video: दगाबाजीचा गर्लफ्रेंडने भयानक बदला घेतला, २०००० प्रेक्षकांसमोर फायटर मॅच अन् प्रेमातही हरला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 05:53 PM2024-06-25T17:53:51+5:302024-06-25T17:55:35+5:30

फायटर मॅचही हरला आणि गर्लफ्रेंडनेही त्याला लग्नाला नकार दिल्याने प्रेमातही हरला आहे. याबाबत समिश्र प्रतिक्रिया येत आहेत. 

Fighter loses match, proposes to girlfriend in front of 20000 spectators in same arena, she straight up says no...social Viral video | Video: दगाबाजीचा गर्लफ्रेंडने भयानक बदला घेतला, २०००० प्रेक्षकांसमोर फायटर मॅच अन् प्रेमातही हरला

Video: दगाबाजीचा गर्लफ्रेंडने भयानक बदला घेतला, २०००० प्रेक्षकांसमोर फायटर मॅच अन् प्रेमातही हरला

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एक फायटर मॅच हरल्यानंतर त्याच मैदानात २० हजार प्रेक्षकांसमोर त्याच्या गर्लफ्रेंडला प्रपोज करताना दिसत आहे. हा फायटर मॅचही हरला आणि गर्लफ्रेंडनेही त्याला लग्नाला नकार दिल्याने प्रेमातही हरला आहे. याबाबत समिश्र प्रतिक्रिया येत आहेत. 

एमॅटर एमएमए फायटर लुकास्झ बुकोवॅक हा नुकताच एक मॅच ०-२ ने हरला आहे. मॅच संपल्यानंतर त्याने प्रेक्षकांसमोरच गर्लफ्रेंडला गुढघ्यावर बसून प्रपोज केला. यावर तिचे उत्तर ऐकून अनेकांच्या काळजात धस झाले होते. नेटकरी आता कोणाचे चूक, कोणाचे बरोबर याचा शोध घेत आहेत. 

फाईट हरल्यानंतर लुकास्झने गर्लफ्रेंडला रिंगणात बोलविले होते. यानंतर तिच्यासमोर त्याने गुढघ्यावर बसून अंगठी पुढे करत लग्नाची मागणी घातली. तिने त्याच्याशी लग्नाला नकार दिला. याचे कारण तो मॅच हरला हे नव्हते. तर तिने त्याला २० हजार लोकांसमोर ती नकार देत असल्याचे कारण देत उघडे पाडले. 
तू आपल्या नातात एकदा मला दगा दिलेला आहेस. यामुळे मी आपल्या नात्याला आणखी एक संधी देऊ इच्छित नाहीय. माझ्याकडून या लग्नाला नकार आहे, असे ती म्हणाली. तिचे हे शब्द ऐकून आधीच मॅच हरल्याचे दु:ख असलेला लुकास्झ आणखी दु:खी होऊन खाली बसला. या घटनेचा व्हिडीओ आता जगभरात व्हायरल होऊ लागला आहे. काहीजण लुकास्झला वाईट वागल्याचे बोल लावू लागले आहेत. काहीजण लुकास्झला एक संधी द्यायला हवी असे सांगत आहेत. तर काही जण जर त्याने दगा दिला तर ती आता त्याच्यासोबत काय करतेय असेही विचारत आहेत. 

तिने नकार दिल्याचे पाहून प्रेक्षकामधून एकजण पाण्याची बॉटल घेऊन जाळ्याच्या रिंगणाबाहेरून तिच्यावर पाणी फेकताना दिसत आहे. अनेक प्रेक्षकांनी तेव्हा ती चुकीची असल्याचे म्हणत आरडाओरडा केला आहे. 

Web Title: Fighter loses match, proposes to girlfriend in front of 20000 spectators in same arena, she straight up says no...social Viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.