'त्याच्या' गळाला लागला डायनोसॉरसारखा दिसणारा विचित्र जीव आणि....
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 01:09 PM2019-09-16T13:09:18+5:302019-09-16T13:16:21+5:30
समुद्रात सापडणारे विचित्र किंवा दुर्मिळ जीव नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. असाच एक वेगळा डायनॉसोरसारखा दिसणारा एक मासा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
समुद्रात सापडणारे विचित्र किंवा दुर्मिळ जीव नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. असाच एक वेगळा डायनॉसोरसारखा दिसणारा एक मासा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. एक तरूण मासेमारीसाठी एका किनाऱ्यावर गेला होता. पण जेव्हा त्याने त्याचा गळ बाहेर काढला तेव्हा गळाला लागलेलं पाहून तोही हैराण झाला.
१९ वर्षीय Oscar Lundahl हा नॉर्वेमधील Andoya बीचवर मासे पकडण्यासाठी गेला होता. त्याने २ हजार ६०० फूट खोलात एक चार आकडे असलेला गळ टाकला. अशात काही वेळाने गळाला काहीतरी लागल्याचं त्याला जाणवलं. जवळपास ३० मिनिटे गळ वर खेचून त्याला एक विचित्र दिसणारा जीव दिसला.
गळाला लागलेला हा मासा पाहून ऑस्कर म्हणाला की, 'मी याआधी असं काही पाहिलं नव्हतं. हा मासा फारच विचित्र आणि डायनोसॉरसारखा दिसत होता. हे काय आहे हे मला माहीत नव्हतं. पण माझ्या मित्राला माहीत होतं'.
एकाने सांगितले की, हा विचित्र दिसणाऱ्या जीवाचा संबंध ३०० वर्ष जुन्या शार्कसोबत आहे. आणि याचं नाव आहे रॅटफिश. याचं डोकं सिंहासारखं तर शेपटी ड्रॅगनसारखी दिसते. हा मासा फारच कमी वेळा गळाला लागतो. कारण हा मासा फार खोल पाण्यात राहतो. या माशाचे डोळे फारच मोठे असल्याने त्यांना खोलवर पाण्यात सगळंकाही स्पष्ट दिसतं.
ऑस्करने नंतर सांगितले की, प्रेशरमुळे मासा मरण पावला. मला माझी मेहनतही वाया घालवायची नव्हती. त्यामुळे मी मासा फ्राय करून खाल्ला. याची टेस्ट चांगली होती. दरम्यान, रॅटफिश हे सामान्यपणे खेकडे, शिंपले खातात. तसेच ते ३ हजार ३०० फूट खोल समुद्रात राहतात. तिथेच ते त्यांचं अन्न शोधतात.