समुद्रात मासे पकडताना दिसला तरंगता फेस, आत सापडला कोट्यावधी रूपयांचा 'खजिना'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 11:29 AM2024-03-14T11:29:16+5:302024-03-14T11:29:57+5:30
सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात काही मासेमारी करणाऱ्या लोकांना काळं सोनं सापडल्याचं दिसत आहे.
तुम्ही अनेकदा अचानक नशीब चमकलेल्या लोकांबाबत ऐकलं किंवा वाचलं असेलच. जगभरात असे अनेक लोक आहेत जे नशीबवान असतात. कुणाला मोठी लॉटरी लागते तर कुणाला खजिना सापडतो. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात काही मासेमारी करणाऱ्या लोकांना काळं सोनं सापडल्याचं दिसत आहे. आता म्हणाल हे काळं सोनं काय असतं? चला तर मग जाणून घेऊ...
यात व्हिडिओत तुम्ही काही लोक समुद्रात बोटीवर असल्याचं बघू शकता आणि त्यांना एक कचऱ्याचा एक मोठा ढीग सापडला आहे. त्यावर बराच फेसही दिसत आहे. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, याच कचऱ्यासारख्या दिसणाऱ्या गोष्टीने हे लोक कोट्याधीश बनले आहेत. कारण यात काळं सोनं म्हणजेच एम्बरग्रीस आहे.
झालं असं की, नेहमीप्रमाणे काही लोक समुद्रात मासे पकडण्यासाठी गेले होते. त्यांना पाण्यावर मोठा कचऱ्यासारखा ढीग तरंगताना दिसला. त्यावर फेसही होता. लोक लगेच त्याजवळ गेले आणि त्यांनी त्यात काय आहे चेक केलं. तर ती एक व्हेलची उलटी होती. ज्याची किंमत कोट्यावधी रूपये असते.
व्हेलच्या उलटीची साइज जेवढी जास्त तेवढी जास्त किंमत मिलते. व्हेलच्या उलटीला एम्बरग्रीस म्हटलं जातं. एकप्रकारे ही व्हेलची विष्ठा असते. जे व्हेल पचवू शकत नाही ते ती उलटीच्या माध्यमातून बाहेर काढते. पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, व्हेलच्या उलटीला इतकी किंमत का मिळते?
तर जगभरातील मोठमोठ्या परफ्युम कंपन्या ही व्हेलची उलटी खरेदी करतात. ही उलटी खरेदी करण्यासाठी मोठी स्पर्धाही असते. कारण ती सहजपणे सापडत नाही. या कंपन्या व्हेलच्या उलटीपासून अनेक परफ्युम तयार करतात. ज्याचा सुंगध जास्त काळ टिकून राहतो. त्यामुळेच या कंपन्या या उलटीसाठी लाखो-कोट्यावधी रूपये मोजण्यास तयार असतात.