धक्कादायक! चिमुकल्याला बॅगेत टाकून नेलं दुबईला, IPS अधिकाऱ्याने शेअर केला एअरपोर्टवरील व्हिडीओ!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 01:51 PM2019-09-17T13:51:36+5:302019-09-17T14:25:50+5:30
सोशल मीडियात एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, आयपीएस अधिकारी एचजीएस धालीवाल यांनी ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.
सोशल मीडियात एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, आयपीएस अधिकारी एचजीएस धालीवाल यांनी ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत दिसतंय की, दुबई एअरपोर्टवर चेकिंग दरम्यान एका ट्रॅव्हल बॅगमध्ये ५ महिन्यांचं बाळ आढळलं आहे. असे म्हटले जात आहे की, लहान मुलाचं अपहरण करून पाकिस्तानच्या कराचीहून आणलं गेलं होतं.
या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं गेलं आहे की, 'बॅगमध्ये ५ महिन्यांचं बाळ आहे. याचं अपहरण करण्यात आलंय. याला कराचीहून दुबईला एका बॅगेत आणलं गेलं. सुदैवाने दुबई एअरपोर्टवर हे प्रकरण उघडकीस आलं. बाळ आता सुरक्षित आहे'.
Baby Bagged!!
— HGS Dhaliwal, IPS (@hgsdhaliwalips) September 15, 2019
A 5 month old baby was kidnapped and carried to Dubai from Karachi inside a Travel Bag.
Fortunately, it was detected at Dubai Airport and the baby was found safe!! pic.twitter.com/qpBKhUu30I
ही घटना नोव्हेंबर २०१८ मध्ये घडली होती. पण याचा व्हिडीओ आता व्हायरल होतो आहे. एअरपोर्टवरील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
सोशल मीडियातील लोकांनी या व्हिडीओवर चांगलाच संताप व्यक्त केलाय. काही लोक पाकिस्तानच्या नावाने बोंबा मारत आहेत. तर काही लोक एअरपोर्ट सिक्युरिटीच्या नावाने. असो, बाळ सुरक्षित आणि त्याच्या परिवाराकडे आहे. तसेच ही या घटनेतील आरोपीही पकडला गेला आहे.