कबुतरांना बाल्कनीपासून दूर ठेवण्याचे सोपे घरगुती उपाय, परत कधी येणार नाही कबूतर!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 11:17 AM2024-09-20T11:17:48+5:302024-09-20T11:18:55+5:30
कबुतरांच्या घाणीमुळे तुम्हाला फुप्फुसांचा गंभीर आजार होऊ शकतो. हा दावा आमचा नाही तर एका रिसर्चमधून करण्यात आला आहे. रिसर्चमधून समोर आलं आहे की, ही समस्या कबुतरांच्या विष्ठेमुळे आणि पखांच्या संपर्कात जास्त वेळ राहिल्याने होते.
अनेक लोकांना कबुतरांचा खूप त्रास होतो. कबूतर बाल्कनीमध्ये येऊन घाण करतात. इतकंच नाही तर तिथेच घरटं बनवून अडींही देतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, कबुतरांच्या घाणीमुळे तुम्हाला फुप्फुसांचा गंभीर आजार होऊ शकतो. हा दावा आमचा नाही तर एका रिसर्चमधून करण्यात आला आहे.
एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, ही समस्या कबुतरांच्या विष्ठेमुळे आणि पखांच्या संपर्कात जास्त वेळ राहिल्याने होते. अशात या जीवघेण्या आजारापासून बचाव करण्यासाठी काळजी घेणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे आज आम्ही कबुतरांना पळवून लावण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय करून कबूतर बाल्कनीमध्ये परत येणार नाहीत.
काळी मिरे आणि लाल मिरची पावडर
कबूतर बाल्कनीपासून दूर ठेवण्यासाठी सगळ्यात सोपा उपाय म्हणजे काळी मिरे आणि लाल मिरची पावडरचा स्प्रे आहे. हे दोन्ही पावडर वेगवेगळ्या पाण्यात मिक्स करून बाल्कनीमध्ये स्प्रे करू शकता. याने कबूतर येणार नाहीत.
विनेगर आणि बेकिंग सोडा
जर तुम्हाला वाटत असेल की, तुमच्या बाल्कनीमध्ये कबूतर परत कधीच येऊ नये तर विनेगर फार फायदेशीर ठरतं. यासाठी एका भांड्यात २ चमचे विनेगर आणि थोडा बेकिंग सोडा पाण्यात मिक्स करा. हे मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये टाका. याने बाल्कनीमध्ये स्प्रे करा. याच्या वासाने कबूतर बाल्कनीतून पळून जातील.
गम किंवा मध
बाल्कनी आणि खिडक्यांवर घाण करणारे कबूतर कधी चिकट जागेवर बसणं पसंत करत नाहीत. अशात त्यांना बाल्कनीपासून दूर ठेवण्यासाठी गमचा वापर करू शकता. तुम्ही बाल्कनीमध्ये गम पसरवून ठेवा किंवा याजागी मध पसरवा. याने कबूतर बाल्कनीमध्ये येणार नाहीत.