डान्सिंग अंकल नंतर डान्सिंग डॅड, तेही विदेशी....भोजपुरी गाण्यावर केला धम्माल डान्स
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 01:40 PM2021-07-08T13:40:17+5:302021-07-08T13:41:42+5:30
म्हाला डान्स करायला आवडत असेल तर तुम्हाला कोणतं गाणं आवडतं? बॉलीवुडची गाणी तर आवडतच असतील पण तुम्ही कधी भोजपूरी गाण्यांवर डान्स केला आहे का? नसेल केला तर करून बघा आणि तुम्हाला स्टेप्सच शिकायच्या असतील तर वॉशिंग्टन मधल्या रिकी पॉंड यांना फॉलो करा.
बॉलीवुडमधल्या गाण्यांवर थिरकणाऱ्या ललनांनाही मागे टाकणारा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर जोरदार व्हायरल होतोय. तुम्हाला डान्स करायला आवडत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तुम्हाला डान्स करायला आवडत असेल तर तुम्हाला कोणतं गाणं आवडतं? बॉलीवुडची गाणी तर आवडतच असतील पण तुम्ही कधी भोजपूरी गाण्यांवर डान्स केला आहे का? नसेल केला तर करून बघा आणि तुम्हाला स्टेप्सच शिकायच्या असतील तर वॉशिंग्टन मधल्या रिकी पॉंड यांना फॉलो करा. त्यांचा भोजपुरी डान्स बघुन तुम्हाला हसू तर आवरणार नाहीच पण तुम्हालाही त्यांच्यासोबत डान्स करायला मजा येईल. एक परदेशी व्यक्ती भोजपूरी गाण्यावर डान्स करते हे पाहुन तुम्ही पोटदुखेपर्यंत हसाल.
वॉशिंगटन मध्ये राहणारे रिकी पाँड हे आपल्या मुलांसोबत बॉलीवुडच्या गाण्यावर डान्स करतच असतात. त्यांचे अनेक बॉलीवुड गाण्याचे व्हिडिओ इंटरनेटवर हिट झाले आहेत. त्यामुळे त्यांचा भोजपुरी गाण्याच्या व्हिडिओलाही नेटीझन्सकडून वाहवा मिळतेय. त्यांनी या व्हिडिओत 'लॉलीपॉप लागेलु' या भोजपूरी गाण्यावर ठेका धरला आहे. विशेष म्हणजे त्यांचा डान्स टिपिकल भोजपूरी स्टाईलमध्ये आहे. हा डान्स बघताना तुम्हालाही डान्स करावासा वाटेल. त्यांच्या या व्हिडिओत त्यांची मुलगीपण मागून डान्स करते आहे. त्यांच्या आधीच्या गाण्यावर प्रिती झिंटानेही कमेंट केली आहे. इन्स्टाग्रामवर डान्सिंग डॅड विथ फोर किड्स ही टॅगलाईन ठेऊन ते आपले व्हिडिओज अपलोड करतात. बीबीसीला मुलाखत देताना ते म्हणाले की मी पेशाने ग्राफिक डिझायनर आहे. मला डान्स करायला खुप आवडतो. माझ्या मुलांनी मला डान्स शिकवला. मी रोज १० तास काम करतो आणि उरलेल्या वेळात डान्स व्हिडिओ तयार करतो. त्यांनी असंही सांगितलं की, मला बॉलीवुडपासून ते भोजपुरी पर्यंत सर्व गाण्यांच्या डान्स स्टेप्स खुप आवडतात.
युजर्सनी तर त्यांच्या या पोस्टवर भरभरून कमेंट्स केल्या आहेत. काहींनी तर त्यांना बॉलीवुडमध्ये येण्यासही सांगितले आहे.