जंगलात ड्युटी करताना फॉरेस्ट गार्डसमोर अचानक आला वाघ, बघा थरकाप उडवणारा व्हिडीओ!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 11:17 AM2024-11-26T11:17:56+5:302024-11-26T11:18:34+5:30
नक्कीच हे काम काही सोपं नाही आणि अशात जर समोर वाघासारखा प्राणी येत असेल काय होत असेल यांचा अंदाज तुम्ही लावू शकता.
Forest Guard Encountered With Tiger: सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या तूफान व्हायरल होत आहे. ज्यात बघू शकता की, दोन फॉरेस्ट गार्डचा वाघसोबत आमना-सामना झाला. व्हायरल झालेल्या या व्हिडिओत थरकाप उडवणारा नजारा बघायला मिळाला. अनेकदा असं बघायला मिळतं की, फॉरेस्ट गार्ड आपला जीव धोक्यात घालून जंगल आणि जंगलातील प्राण्यांची रक्षा करतात. नक्कीच हे काम काही सोपं नाही आणि अशात जर समोर वाघासारखा प्राणी येत असेल काय होत असेल यांचा अंदाज तुम्ही लावू शकता.
जरा विचार करा की, तुम्ही जंगलात फिरत आहात आणि अचानक तुमच्यासमोर वाघ येऊन उभा राहतो. नक्कीच धडकी भरेल. मात्र, या व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, गार्ड्सनी डोकं लावलं आणि आपला जीव वाचवला. या गार्ड्सचं नाव अन्नुलाल आणि दाहाल सांगण्यात आलंय. त्यांना आधीच त्यांच्या आजूबाजूला वाघ असल्याची जाणीव झाली होती. अशात ते जीव वाचवण्यासाठी झाडावर चढले. दुसरीकडे वाघ त्यांच्याकडे बघत होता. त्याला शिकार जवळच असल्याची जाणीव झाली होती. अशात वाघाची हळुवार चाल अन्नुलाल आणि दाहाल दोघांच्याही दृदयाचे धडधड वाढवत होती. काही सेकंदासाठी असं वाटलं वाघ त्यांच्यावर हल्ला करणार. मात्र नंतर तो तिथून निघून गेला.
What a story of bravery and presence of mind. Shri Annulal and Dahal - two forest guards encountered a tiger in Satpura TR while on duty. One of them captured on mobile. What it takes to save wildlife and forest on field. pic.twitter.com/SuNAadit4y
— Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) November 24, 2024
हा व्हिडीओ आयएफएस अधिकारी परवीन कासवान यांनी त्यांच्या एक्स हॅंडल @ParveenKaswan वर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनला लिहिलं की, 'बहादुरी आणि प्रेजेन्स ऑफ माइंडची कहाणी काय आहे. दोन फॉरेस्ट गार्डचा ड्युटी दरम्यान सातपुडा टीआरमध्ये वाघासोबत आमना-सामना झाला. ही घटना एका व्यक्तीने मोबाइलमध्ये कॅप्चर केली. वाइल्ड लाइफ आणि जंगल वाचवण्यासाठी काय काय करावं लागतं'. पुढे त्यांनी लिहिलं की, 'ही घटना गेल्या महिन्यातील आहे. दोघेही ड्युटीवर होते. तेव्हाच त्यांना वाघाचा आवाज आला आणि दोघेही लगेच झाडावर चढले. अन्नुलालने व्हिडीओ रेकॉर्ड केला. वाघ निघून गेल्यावर दोघेही घरी सुरक्षित पोहोचले. हा व्हिडीओ आतापर्यंत दोन लाखपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.