एक जज अन् दुसरा गुन्हेगार...शाळेतील मित्र-मैत्रिणीची भेट आणि मग....
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 01:04 PM2023-10-12T13:04:45+5:302023-10-12T13:08:57+5:30
तुमच्याही शाळेत असे अनेक मित्र किंवा मैत्रिणी राहिल्या असतील ज्यांच्यासोबत तुम्ही मस्ती केली, जेवण केलं, अभ्यास केला. पण ते आजही तुमच्यासोबत आहेत का? कदाचित नसतील.
आयुष्य खूप मोठं आहे, पण पृथ्वी गोल आहे. कधीना कधी लोक एकमेकांना पुन्हा पुन्हा अचानक भेटतात. काहींसोबत आयुष्यभर संपर्क असतो तर काहींसोबत बालपणीच ताटातूट होते. पण त्यांच्या धुसर आठवणी मनात नेहमी जागा करून असतात. तुमच्याही शाळेत असे अनेक मित्र किंवा मैत्रिणी राहिल्या असतील ज्यांच्यासोबत तुम्ही मस्ती केली, जेवण केलं, अभ्यास केला. पण ते आजही तुमच्यासोबत आहेत का? कदाचित नसतील.
बालपणीच्या अनेक आठवणी सगळ्यांच्याच मनात असतात. जर त्या मित्रांची अचानक 30 किंवा 40 वर्षांनंतर भेट झाली तर कसं वाटेल? असंच काहीसं दोघांसोबत झालं. यांची कहाणी ऐकून अनेक लोक भावूक झाले होते. आज पुन्हा या दोघांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
आर्थुर बूथ आणि माइंडी ग्लेजर दोघेही एकाच शाळेत शिकत होते. आर्थुर बूथ मॅथ्स आणि सायन्समध्ये हुशार होता. तो घरातील लोकांना नेहमी सांगायचा की, त्याला मोठं होऊन न्यूरोसर्जन व्हायचं आहे. तो अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील मियामीमधील नॉटिलस मिडिल स्कूलमध्ये शिकत होता. तिथेच माइंडी ग्लेजर शिकत होती. तिचीही काही स्वप्ने होती. तिला एका पशु चिकित्सक व्हायचं होतं. पण नंतर तिने वकिल बनण्याचा निर्णय घेतला. ती लॉ स्कूलमध्ये गेली आणि टॉपची वकिल बनली.
Man facing charges in court starts crying when he recognizes the judge from middle school pic.twitter.com/Ckj93TM9WH
— Crazy Clips (@crazyclipsonly) October 5, 2023
दोघेही आपल्या करिअरसाठी आपापल्या मार्गाने गेलेत. नंतर अनेक वर्षांनी अचानक त्यांची भेट झाली. माइंडीने आर्थुरला बघताच ओळखलं. ती त्याला म्हणाली की, तू तर तोच आहे ज्याच्यासोबत मी फुटबॉल खेळत होते. पण तू इथे कसा? यांची भेट झाली कोर्ट रूममध्ये झाली होती. माइंडी जज होती आणि तिच्यासमोर आरोपी म्हणून आर्थुर होता. कोर्ट रूममधील दोघांचा व्हिडीओ जगाने पाहिला.
आर्थुरला जुगार आणि ड्रग्सची सवय होती. अनेक चोऱ्याही त्याने केल्या होत्या. पोलिसांच्या तावडीतून पळून गेला होता. सुनावणी सुरू झाली तेव्हा तो असा वागत होता जसा त्याला त्याच्या गुन्ह्यांचा काहीच पश्चाताप नाही. पण जेव्हा त्याला जज माइंडीने त्याला प्रश्न विचारला की, तुम्ही नॉटिलस मिडल स्कूलमध्ये होते. हे ऐकून आर्थुर रडू लागला. त्याला गोष्टी आठवल्या. त्याच्यासमोर त्याची शाळेतील मैत्रीण जज म्हणून बसली होती.
शाळा सोडल्यानंतर ही त्यांची पहिली भेट होती. तो एक मोठा गुन्हेगार झाला होता. त्याने बरीच वर्ष तुरूंगात घालवली. त्याला जास्त पैसे कमवायचे होते. तो 17 वयापासून तुरूंगात जात-येत होता. ज्यामुळे त्याचं करिअर घडलं नाही. त्याला चुकीच्या सवयी लागल्यांमुळे असा झाला होता.
आर्थुर तुरूंगातून पळून जाण्यासाठी आणि चोरीच्या आरोपात तुरूंगात होता. हा व्हिडीओ 2015 मधील आहे. दोघेही 1970 काळात मियामीमधील शाळेत शिकत होते. त्याला जन्मताच सहा बोटे होती. त्यामुळे परिवाराला वाटलं होतं की, तो आयुष्यात काहीतरी वेगळं करेल. पण 11 वीमध्ये शिकत असताना त्याला जुगाराची सवय लागली. 18 वर्षाचा असताना एका मोठ्या चोरीमध्ये सहभागी होता. मग त्याला ड्रग्सची सवय लागली.
22 वर्षाचा असताना त्याला 20 वर्षांची शिक्षा झाली. पेरोलवर बाहेर येण्याआधी तो 10 वर्ष तुरूंगात राहिला. दुसरीकडे माइंडीने लॉ चं शिक्षण घेतलं आणि नंतर ती जज बनली. 2015 मध्ये आर्थुर माइंडीसमोर होता. आपल्या शाळेतील मित्राला असं पाहून ती हैराण झाली. तेव्हा तो बोलला की, त्याने अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. पण त्याला आता स्वत:त बदल करायचा आहे. माइंडी त्याला म्हणाली की, हा मिडल स्कूलमधील सगळ्यात चांगला मुलगा होता. मी त्याच्यासोबत फुटबॉल खेळत होते आणि बघा काय झालं...हे ऐकून आर्थुर रडू लागला होता.
यानंतर त्याला तुरूंगात 10 महिने रहावं लागलं. नंतर तो बाहेर आला. यावेळी सगळं बदललं होतं. आता तो आधीचा आर्थुर नव्हता. यानंतर त्याने गुन्हेगारी सोडली आणि एक चांगलं जीवन जगत होता. त्याने पुस्तके वाचली. त्याने बिझनेस करण्याचा निर्णय घेतला. जेव्हा तो तुरूंगातून बाहेर आला तेव्हा माइंडीही तिथे उपस्थित होती. तिने आर्थुरला नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. आर्थुरने तिला शब्द दिला की, तो पुन्हा कधीही तुरूंगात जाणार नाही. सगळी वाईट कामे सोडणार. या कोर्ट रूमच्या व्हिडिओला व्हायरल होऊन 6 पेक्षा जास्त वर्ष झाली आहेत. आता तो एका कंपनीत मॅनेजर आहे.