थरारक! बिल्डींगला आग लागल्याने चिमुकल्यांनी खिडकीतून ४० फुटांवर मारली उडी; व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 02:22 PM2020-07-23T14:22:21+5:302020-07-23T14:39:24+5:30
या लहान मुलांना त्यांच्या पालकांनी घरात लॉक करून ठेवले होते. त्यामुळेच इमारतीला आग लागल्यानंतर या चिमुरड्यांवर ४० फुटांवरून उडी मारण्याची वेळ आली.
फ्रांसमधील एका बिल्डींगला आग लागल्यानंतर चिमुरड्यांनी तिसऱ्या मजल्यावरून जीव वाचवण्यासाठी उडी घेतली आहे. सुदैवाने यात लहान मुलांना कोणतीही दुखापत झालेली नाही. खाली उभ्या असलेल्या सुरक्षा रक्षकांनी या चिमुरड्यांना खाली आदळण्यापासून वाचवलं आहे. हा व्हिडीओ सध्या वेगानं व्हायरल होत आहे. डेलीमेलने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी ग्रेनोबल शहरात एका बचाव अभियानाचे फुटेज व्हायरल होत होते.
या लहान मुलांना त्यांच्या पालकांनी घरात लॉक करून ठेवले होते. त्यामुळेच इमारतीला आग लागल्यानंतर या चिमुरड्यांवर ४० फुटांवरून उडी मारण्याची वेळ आली. या भावंडांपैकी ३ वर्षांचा मुलगा १० वर्षांच्या मुलांना कोणतीही शारीरिक दुखापत झालेली नाही. सीटीव्हीने दिलेल्या माहितीनुसार बचावकार्याचे हे फुटेज शेजारच्या लोकांनी कॅप्चर केले आहे. तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता.
#COVID19#accident#grenoble ( Ce mardi il a y’a quelques heures dans l’après midi 2 enfants ont sauté par la fenêtre rattraper par les habitants ❤️🙏 pic.twitter.com/xzIYpL4b3Y
— oumse-dia (@oumsedia69) July 21, 2020
बिल्डींगमधून ज्वाळा बाहेर येत आहेत. खाली उभ्या असलेल्या लोकांचे बचावकार्य सुरू आहे. खिडकीच्या बाहेर लटकत असलेल्या लहान मुलांना दरवाजा लॉक असल्यामुळे बाहेर निघता आले नाही. म्हणून त्यांनी खिडकीकडे धाव घेतली. मोठ्या भावाने आधी सगळ्यात आधी तीन वर्षाच्या भावाला बाहेर काढले त्यानंतर खाली उपस्थित असलेल्या सुरक्षा दलाच्या लोकांनी खाली पडण्यापासून वाचवले. त्यानंतर मोठ्या भावाने उडी मारून स्ववतःचा जीव वाचवला.
या भावंडाना कोणतीही जखम झाली नाही. तर आगीच्या धुराच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना बिल्डींगमधील इतर लोक मिळून या लहान मुलांना दवाखान्यात घेऊन गेले. कारण या प्रकारामुळे ही मुलं प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत होती. भीतीने ही मुलं रडत होती. ग्रेनोबलचे एरिक पियोले यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यामातून बचावकार्य करत असलेल्या लोकांना धन्यवाद दिले आहे. सध्या ही आग कशामुळे लागली होती. याचा शोध घेतला जात आहे.
फक्त सरनेममुळे महिलेचा नोकरीचा अर्ज पुन्हा पुन्हा रिजेक्ट, लोकही उडवतात खिल्ली!
अर्धवट शिजवलेला मासा खाणं महागात पडलं; चिनी व्यक्तीनं निम्मं यकृत गमावलं