फक्त जिभेने स्पर्श करताच या किड्याने दिला बेडकांना वीजेचा झटका, पाहा हा किडा कोणता?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 03:48 PM2022-08-08T15:48:38+5:302022-08-08T15:57:19+5:30

एक किडा आहे. ज्याने बेडकांना मोठा झटका दिला आहे. किड्याला पाहताच बेडकांनी त्यांना खाण्याचा प्रयत्न केला पण त्याला तोंडात घेताच त्यांना 420 व्होल्टचा झटका बसला.

frogs got electric shock of 420 volt after trying to eat insect funny video goes viral on internet | फक्त जिभेने स्पर्श करताच या किड्याने दिला बेडकांना वीजेचा झटका, पाहा हा किडा कोणता?

फक्त जिभेने स्पर्श करताच या किड्याने दिला बेडकांना वीजेचा झटका, पाहा हा किडा कोणता?

Next

असे किती तरी जीव आहेत, ज्यांच्याबाबत आपल्याला माहितीही नाही. अशाच एका जीवाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा एक किडा आहे. ज्याने बेडकांना मोठा झटका दिला आहे. किड्याला पाहताच बेडकांनी त्यांना खाण्याचा प्रयत्न केला पण त्याला तोंडात घेताच त्यांना 420 व्होल्टचा झटका बसला.

बेडकांना तुम्ही शिकार करताना पाहिलंच असतं. समोर काही दिसलं की आधी एकटक त्याच्याकडे पाहत राहायचं आणि काही वेळातच आपली जीभ बाहेर काढून ती लांभ करायची आणि पटकन त्याला आपल्या तोंडात घ्यायचं. आपल्या डोळ्याची पापणी लवते न लवते तोच बेडुक आपल्या शिकाऱ्याला तोंडात घेऊन गिळूनही टाकतो. असाच हा व्हिडीओ आहे. पण यावेळी बेडकाला शिकार चांगलीच महागात पडली. ज्याला त्यांनी छोटी आणि सोपी शिकार समजलं तो खूपच खतरनाक होता.

व्हिडीओत पाहू शकता तीन बेडुक एका ठिकाणी एकत्र बसले आहे. त्यांच्यासमोरून एक छोटासा किडा जातो. पिवळ्या-हिरव्या रंगाचा हा किडा आहे. तिन्ही बेडुक आधी त्याच्याकडे पाहताच. किड्याचं नीट निरीक्षण करतात. त्यानंतर एक बेडुक त्याला खाण्याचा प्रयत्न करतो. तो आपली जीभ काढून त्या किड्याला स्पर्श करतो. तोच त्याला झटका लागतो आणि तो शांतच बसतो. पुन्हा काही त्या किड्याला तो खात नाही. त्यानंतर तीन बेडकांपैकी सर्वात मोठा असलेला बेडुक त्या किड्यावर ताव मारायला जातो. तो आपली जीभ लांब करत त्या किड्याला तोंडातही घेतो. पण पुढच्याच क्षणी त्याला तोंडाबाहेर फेकतो आणि आपलं तोंडावर हात मारतो. जणू काही त्याला करंटच लागला आहे.

त्या दोघांच्या मध्ये असलेला बेडुक तर मग त्या किड्याची शिकार करण्याची हिंमतच करत नाही. आपल्या साथीदारांची अवस्था पाहून तो आपला गप्प शांत तसाच बसून राहतो.

@TheFigen ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला आणि या व्हिडीओतील किडा कोण आहे, हे तुम्हाला माहिती असेल तर आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.

Web Title: frogs got electric shock of 420 volt after trying to eat insect funny video goes viral on internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.