बापरे! तीन वर्षाच्या मुलाने सापालाचा घेतला चावा, लोक म्हणाले, तो वाचलाच कसा; नेमकं प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 02:41 PM2023-06-05T14:41:54+5:302023-06-05T14:42:21+5:30
हा प्रकार पाहून मुलाच्या कुटुंबीयांना भीती वाटली. त्यांनी तात्काळ मुलाला घेऊन रुग्णालय गाठले.
उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका तीन वर्षाच्या मुलाने चक्क सापाचा चावा घेतला.ही घटना उत्तर प्रदेशातील फारुखाबाद येथील आहे. या घटनेनंतर तो तीन वर्षाचा मुलगा बचावला आहे. अनेकांनी या घटनेवर आश्चर्य व्यक्त केले आहे.
Video: पुल कोसळला, भाजप म्हणतंय पैसे खाल्ले; आता, मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले...
मिळालेली माहिती अशी, प्रकार पाहून मुलाच्या कुटुंबीय घाबरले. त्यांनी तात्काळ मुलाला घेऊन हॉस्पिटल गाठले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, मुलाची प्रकृती ठीक आहे, तो धोक्याबाहेर आहे. ही घटना मोहम्मदाबादच्या मदनापूर गावातली आहे. मुलाचे नाव आयुष आहे. मुलगा घराच्या अंगणात खेळत असताना त्याला साप दिसला. दरम्यान, त्याने सापाला पकडून तोंडात दाबले आणि चावण्यास सुरुवात केली.
वडील दिनेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, अचानक आजीची नजर आयुषवर पडली. तिने धावत जाऊन आई सुनीताला बोलावले. यानंतर मुलाच्या आईने त्याच्या तोंडातून साप बाहेर काढला. त्याच्या तोंडाला रक्त लागले होते. त्याचे तोंड लगेच पाण्याने स्वच्छ करण्यात आले. यानंतर काही अनुचित प्रकार घडल्याने कुटुंबीयांना काळजी वाटू लागली. सापाचे विष मुलाच्या अंगात गेले असावे असे त्यांना वाटले. त्यामुळे त्यांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. सोबत पॉलिथिनमध्ये मृत साप घेतला. त्यामुळे डॉक्टर साप ओळखू शकतात आणि मुलाला अँटी डोस देऊ शकतात.
डॉक्टरांनी दिलेली माहिती अशी, मुलाला २४ तास निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. त्याला औषध देण्यात आले. त्याला काही अडचण नव्हती. त्यानंतर त्याला त्याच्या पालकांसह घरी पाठवण्यात आले. कदाचित हा साप विषारी प्रजातीचा नव्हता. मात्र, साप चावल्यानंतरही मूल सुरक्षित कसे, याबाबतही काही जण आश्चर्य व्यक्त करत आहेत.