इतिहासाच्या पेपरमध्ये विद्यार्थ्याने लिहिलेलं उत्तर वाचून शिक्षक 'कोमात', हसून हसून व्हाल लोटपोट!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 02:17 PM2024-10-19T14:17:35+5:302024-10-19T14:18:48+5:30
व्हायरल झालेली ही उत्तरपत्रिका संगम यूनिव्हर्सिटी नावाच्या एका शिक्षण संस्थेतील आहे. जी हिंदी भाषेतील एका बॅक पेपरची उत्तरपत्रिका आहे.
Funny Answersheet Viral: सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या मजेदार उत्तरपत्रिका व्हायरल होत असतात. ज्यात विद्यार्थी असं काही लिहितात, ज्याबाबत कुणी कल्पनाही केलेली नसते. अशीच एक उत्तरपत्रिका व्हायरल झाली आहे. ज्यात असं उत्तर लिहिलंय, जे वाचून तुमचंही डोकं चक्रावून जाईल.
व्हायरल झालेली ही उत्तरपत्रिका संगम यूनिव्हर्सिटी नावाच्या एका शिक्षण संस्थेतील आहे. जी हिंदी भाषेतील एका बॅक पेपरची उत्तरपत्रिका आहे. ज्यात आशिष कुमार ऊर्फ गोल्डी नावाच्या एका विद्यार्थ्याने इतिहासासंबंधी प्रश्नाचं असं उत्तर लिहिलं जे वाचून शिक्षकासोबतच सोशल मीडिया यूजरची डोकं चक्रावून गेलं.
प्राचीन इतिहासाच्या पेपरमध्ये विचारण्यात आलेल्या या प्रश्नाचं उत्तरात विद्यार्थ्याने सिकंदरचा घोडा कसा धावला याबाबत लिहिलं...तबड़क, तबड़क, तबड़क...जे वाचून शिक्षकानेही नंबरसोबत असा रिमार्क दिला जो वाचून लोक लोटपोट होऊन हसले.
Teacher ke Fisaddi remark ne student ke life mein kiya Kalesh 🙂↔ pic.twitter.com/61jJtNkpA9
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) October 18, 2024
यात विचारण्यात आलं होतं की, झेलमच्या युद्धाबाबत 300 शब्दात वर्णन करा. याच्या उत्तरात विद्यार्थ्याने लिहिलं की, प्राचीन भारत में झेलम का युद्ध बहुत महत्वपूर्ण था, जिसमें सिकंदर ने पोरस के पीछे घोड़े दौड़ाए थे. तबड़क, तबड़क, तबड़कतबड़क, तबड़क, तबड़क, तबड़क, तबड़क, तबड़कतबड़क, तबड़क, तबड़क, तबड़क, तबड़कतबड़क, तबड़क...जिसके जबाव में पोरस भी सिकंदर पर तीर चलाता है. धाय, धाय, धाय... इसे काटते हुए छात्र आगे लिखता है- सॉरी माफ करना...साय-साय, साय-साय, साय-साय, साय-साय, साय-साय, साय-साय...वो सिकंदर ही कहलाता है, हारी बाजी को जीतना जिसे आता है...
शिक्षकाने ही मजेदार उत्तरपत्रिका वाचून विद्यार्थ्याला 80 पैकी 7 नंबर दिले. ही पोस्ट आतापर्यंत 71 हजारांपेक्षा जास्त वेळ बघण्यात आली आहे. तर 1 हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. तसेच लोकांनी अनेक मजेदार कमेंट्स केल्या आहेत.