इतिहासाच्या पेपरमध्ये विद्यार्थ्याने लिहिलं असं उत्तर, शिक्षक गेले 'कोमात'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 04:14 PM2024-11-18T16:14:19+5:302024-11-18T16:26:55+5:30
अनेक विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकाही व्हायरल होत असतात. ज्यातील उत्तरे वाचून डोकं चक्रावून जातं. सध्या असंच एक उत्तर व्हायरल झालं आहे.
शाळा-कॉलेजमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या बुद्धीमत्तेचे विद्यार्थी असतात. काही विद्यार्थी मुळातच हूशार असतात तर काही विद्यार्थी कसेतरी शिक्षण पूर्ण करतात. काही विद्यार्थी फार क्रिएटिव डोकं लावणारे असतात. सध्या विद्यार्थ्यांच्या अशाच क्रिएटिविटी सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. अनेक विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकाही व्हायरल होत असतात. ज्यातील उत्तरे वाचून डोकं चक्रावून जातं. सध्या असंच एक उत्तर व्हायरल झालं आहे.
अशाच एका क्रिएटिव विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका सध्या व्हायरल झाली आहे. यात त्याने प्रश्नाचं जे उत्तर दिलं ते वाचून तुम्ही पोटधरून हसाल. बघून तुम्ही हेच म्हणाला की, इतकी क्रिएटिविटी यांच्यात येते कुठून? इतकं अभ्यासात लावलं असतं तर पुढे गेला असता.
1857 च्या क्रांति वर ‘प्रकाश’ टाका
या पोस्टमध्ये तुम्ही बघू शकता की, एका विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका आहे. यात त्याने जे उत्तर लिहिलं ते वाचून शिक्षकच काय तर सोशल मीडिया यूजर्सही चक्रावून गेले आहेत. फोटोत बघू शकता की, हिंदी प्रश्न विचारण्यात आला आहे की,1857 की क्रांति पर प्रकाश डालिए. विद्यार्थ्याने याच्या उत्तरात 1857 की क्रांति लिहून त्यासमोर टॉर्चचं चित्र काढलं आहे. अर्थातच कुणालाही हे बघून हसू आवरल्याशिवाय राहिलं नसेल.