'दोन दिवसांपासून ताप खूप आलाय...; विद्यार्थ्याचा रजा अर्ज वाचून हसून हसून पडाल, IAS अधिकाऱ्याने शेअर केला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 12:49 PM2023-03-23T12:49:40+5:302023-03-23T12:50:20+5:30

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही, सध्या एका विद्यार्थ्याचा रजा अर्ज चांगलाच व्हायरल झालाय.

funny application written by the student in bundelkhandi to up school teacher | 'दोन दिवसांपासून ताप खूप आलाय...; विद्यार्थ्याचा रजा अर्ज वाचून हसून हसून पडाल, IAS अधिकाऱ्याने शेअर केला फोटो

'दोन दिवसांपासून ताप खूप आलाय...; विद्यार्थ्याचा रजा अर्ज वाचून हसून हसून पडाल, IAS अधिकाऱ्याने शेअर केला फोटो

googlenewsNext

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही, सध्या एका विद्यार्थ्याचा रजा अर्ज चांगलाच व्हायरल झालाय. एका आयएएस अधिकाऱ्याने या अर्जाचा फोटो शेअरे केला आहे. आपल्याकडे विद्यार्थ्यांना शाळेतून सुट्टी घ्यायची असेलतर रजा अर्ज देणे गरजेचे असते, या अर्जात सुट्टीचे कारणही लिहावे लागते. या अर्जातील कारण वाचले तर तुम्हालाही हसू आवरता येणार नाही.  

तुमच्या लहानपणी तुम्ही जेव्हा कधी आजारी पडता तेव्हा तुम्ही तुमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना सुट्टीच्या अर्जासाठी एक अर्ज लिहिला असेल. मात्र, काळानुसार अनेक गोष्टी बदलल्या. लोक आता फोन किंवा ईमेलद्वारे त्यांचे रजेचे अर्ज मंजूर करतात, पण जुन्या काळात गोष्टी वेगळ्या होत्या. असे काही आहेत जे स्वतःच्या मातृभाषेत अर्ज लिहायचे. असाच एक अर्ज व्हायरल होत आहे. 

आयएएस अधिकारी अर्पित वर्मा यांनी शेअर केलेले ट्विट कलुआ नावाच्या विद्यार्थ्याने लिहिलेला रजा अर्ज आहे. बुंदेलखंडी पद्धतीने, विद्यार्थ्याने आपली परिस्थिती तपशीलवार सांगितली आणि नंतर शाळेच्या मुख्याध्यापकांकडून सुट्टी मागितली. कलुआ नावाच्या विद्यार्थ्याने अर्जाच्या सुरुवातीला लिहिले की, मला दोन दिवसापासून ताप आला आहे, तो अजुनही कमी आलेला नाही. यामुळे आम्ही नवीन शाळेत आलो नाही. त्यामुळे दोन-चार दिवस सुट्टी दिलीत तर खूप बरे होईल अशी विनंती त्याने केली आहे. पत्राचा शेवट मजेशीर पद्धतीने केला आहे.'मी शाळेत आलो नाही तर शाळा बंद होणार आहे का? असा प्रश्नही त्याने केला आहे.

भविष्यात रजेसाठी अर्ज करताना ते समान टेम्पलेट कसे वापरतील यावर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केली आहे. एका यूजरने लिहिले की, 'वाह जी वाह क्या गजब पंच मारा है'. दुसर्‍या यूजरने लिहिले, 'कलुआ खरच बोलत आहे,तो नाही गेला तर कोणती  शाळा बंद पडणार आहे, दुसर्‍या युजरने लिहिले, मात्र, बुंदेलखंडी भाषा वाचून खूप आनंद झाला. हा फोटो सोशळ मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Web Title: funny application written by the student in bundelkhandi to up school teacher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.