Viral Video: पदर घेऊन 'महिला' करत होती धमाकेदार डान्स, पदर उचलताच बसला सर्वांना धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 13:40 IST2021-09-28T13:31:16+5:302021-09-28T13:40:16+5:30
पहिल्यांदा तर तुम्हाला हा व्हिडीओ फार सामान्य वाटेल. पण जसं सत्य समोर येईल तसा तुम्हाला धक्का बसेल. इतकंच नाही तर तुम्हाला धक्का बसल्यावर तुम्ही जागेवर उडीही मारू शकता.

Viral Video: पदर घेऊन 'महिला' करत होती धमाकेदार डान्स, पदर उचलताच बसला सर्वांना धक्का
आजकाल लोक फेमस होण्यासाठी नको नको ते करतात. अनेकदा तर लोक असे कारनामे करतात ज्याबाबत सत्य जाणून घेतल्यावर थक्क व्हायला होतं. काही लोकांना यात यश मिळतं तर अनेकांचा पोपटही होतो. सोशल मीडियावर एक असाच व्हिडीओ सध्या लोकांना पाट धरून हसायला भाग पाडत आहे. लोकांना हा व्हिडीओ इतका आवडला की, लोक पुन्हा पुन्हा हा व्हिडीओ बघत आहेत.
पहिल्यांदा तर तुम्हाला हा व्हिडीओ फार सामान्य वाटेल. पण जसं सत्य समोर येईल तसा तुम्हाला धक्का बसेल. इतकंच नाही तर तुम्हाला धक्का बसल्यावर तुम्ही जागेवर उडीही मारू शकता. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, या व्हिडीओत असं काय आहे? तर या व्हिडीओत एक 'महिला' पदर डोक्यावर घेऊन जबरदस्त ठुमके मारत आहे. पण जसा पदर काढला जातो सर्वांना धक्का बसतो. कारण ती महिला नाही तर पुरूष आहे. साडी नेसून अंदाजात त्याने डान्स केला लोकांनी त्याला ओळखलंच नाही. हा व्हिडीओ पाहून तुम्ही नक्कीच पोट धरून हसाल.
व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. कारण यात काही क्षणात मोठा अपेक्षाभंग होतो. आता तुम्ही विचार करत असाल की लोकांमध्ये इतकं टॅलेंट येतं कुठून. तर त्याचं काही उत्तर नाही. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडीओ 'official_viralclips' नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअऱ करण्यात आला आहे.