बापरे! खड्ड्यात अडकलेला ट्रक बाहेर काढायच्या नादात 'असं' काही झालं; पाहा व्हायरल व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 03:22 PM2020-09-17T15:22:52+5:302020-09-17T15:52:38+5:30
अनेकदा वाहनांचं नुकसानही होतं. कधी कधी चर क्रेन किंवा जेसीबी आणून अडकलेली वाहनं बाहेर काढावी लागतात. आज आम्ही तुम्हाला असाच एक व्हिडीओ दाखवणार आहोत.
रस्ते खराब असल्यामुळे अनेकदा वाहन चालकांना समस्यांचा सामना करावा लागतो. दुचाकी, सायकल किंवा लहान वाहनं असतील एक एखादा दुसरा माणूस मदतीला आल्यास धक्का मारून बाहेर काढू शकतो. पण बस ट्रक यांसारखी मोठी वाहनं एखाद्या ठिकाणी अडकली तर बाहेर काढण्याासाठी बराच वेळ लागतो. अनेकदा वाहनांचं नुकसानही होतं. कधी कधी चर क्रेन किंवा जेसीबी आणून अडकलेली वाहनं बाहेर काढावी लागतात. आज आम्ही तुम्हाला असाच एक व्हिडीओ दाखवणार आहोत.
THAT could be an issue. 🤦♂️😳😬😏🤣 pic.twitter.com/0fM952QyDo
— Fred Schultz (@fred035schultz) September 16, 2020
हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. Fred Schultz @fred035schultz या ट्विटर युजरने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तुम्ही या व्हिहीओमध्ये पाहू शकता की या अडकलेल्या ट्रकच्यामागे एक टँकर आहे. हे टँकर पाण्याने भरलेलं असावा. जेसीबी मशिनच्या साहाय्याने हा ट्रक ख़ड्यातू बाहेर काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर ट्रकचा पुढच्या भाग निघून पडला आहे.
हा व्हिडीओ पाहून अनेक सोशल मीडिया युजर्सना हसू अनावर झालं आहे. या व्हिडीओला आतापर्यंत १३ हजारांपेक्षा जास्त व्हिव्हज मिळाले असून युजर्सनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. याआधीही असाच एक देशी जुगाड केल्याचा व्हिडीओ आनंद महिद्रांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला होता सोशल मीडिया युजर्सनी या व्हिडीओला खूप पसंती दिली होती.
हे पण वाचा-
VIDEO : चोरी गेलेला फोन सापडला जंगलात, गॅलरी चेक केल्यावर जे दिसलं ते पाहून बसला धक्का!
Video : मास्क न घातला हंसाजवळ गेली अन् हंसाने रागात 'या' महिलेसोबत केलं असं काही...
बापरे! रस्त्याच्या कडेला पांढरी चादर ओढून झोपलेल्या माणसाला लोक मृतदेह समजले अन् मग....
हाताने नाकावरचे पिंपल्स फोडणं चांगलंच अंगाशी आलं; मेंदूत झालं गंभीर इन्फेक्शन अन् मग...