नवरदेव घास भरवायला जाताच नवरीने दिली अशी रिअॅक्शन की नवऱ्याला फुटला घाम...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 02:47 PM2021-08-15T14:47:46+5:302021-08-15T15:02:10+5:30
आजही काही पालक मुलीचं म्हणणं ऐकून न घेताच लग्न लावतात. सोशल मीडियावर व्हायरल (Viral on Social Media) होत असलेल्या एका व्हिडिओमधील नवरीचं (Bride Video) वागणं पाहून तुम्हाला याच गोष्टीचा प्रत्यय येईल.
सध्याच्या काळात लग्न करताना मुला-मुलीची संमती घेतल्याशिवाय लग्न होत नाहीत. मात्र, आजही काही पालक मुलीचं म्हणणं ऐकून न घेताच लग्न लावतात. सोशल मीडियावर व्हायरल (Viral on Social Media) होत असलेल्या एका व्हिडिओमधील नवरीचं (Bride Video) वागणं पाहून तुम्हाला याच गोष्टीचा प्रत्यय येईल.
इन्स्टाग्रामवर (Instagram) सध्या एक लग्नाचा व्हिडिओ (Wedding Video) चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दिसतं, की लग्न झाल्यानंतर नवरी आणि नवरदेव जेवायला बसलेले आहेत. लग्नानंतर नवरा नवरी एकमेकांना आपल्या हातानं जेवणाचा घास भरवतात. तशी परंपराच आहे. या परंपरेनुसार नवरा नवरीला घास भरवायला जातो. पण नवरी तिचं तोंड दुसरीकडे फिरवते. नवरीचे हे नखरे बघुन हतबल झालेला नवरा इकडे तिकडे पाहु लागतो.
हा व्हिडिओ पाहून असं जाणवतं, की एकतर या मुलीचं जबरदस्ती लग्न केलं जात आहे किंवा मग ती कुठल्यातरी गोष्टीमुळे नाराज आहे. कमेंट्समध्येही अनेक नेटीझन्सनी नेमकी अशीच मत व्यक्त केली आहेत. हा व्हायरल व्हिडिओ आतापर्यंत ५१ हजारहून अधिकांनी पाहिला आहे.