Funny Video: कुत्र्यांसमोर बिनधास्त होऊन नाचली 'बसंती', रस्त्याच्या मधोमध दिला लाइव्ह परफॉर्मन्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 07:02 PM2021-07-19T19:02:19+5:302021-07-19T19:03:47+5:30

सोशल मीडियावर आयपीएस अधिकारी  रूपिन शर्मा याांनी एक मजेदार  (Funny Video) व्हिडीओ शेअऱ केला आहे. हा व्हिडीओ पाहून लोक नॉस्टॅल्जिक होत आहेत.

Funny video of girl dancing in front of dogs on street, basanti dance viral video | Funny Video: कुत्र्यांसमोर बिनधास्त होऊन नाचली 'बसंती', रस्त्याच्या मधोमध दिला लाइव्ह परफॉर्मन्स...

Funny Video: कुत्र्यांसमोर बिनधास्त होऊन नाचली 'बसंती', रस्त्याच्या मधोमध दिला लाइव्ह परफॉर्मन्स...

Next

काही लोक बिनधास्तपणे आपलं जीवन जगण्यावर विश्वास ठेवतात. हे वागत असताना त्यांना समाजाची काही पडलेली नसते. सोशल मीडियावर (Social Media) एका तरूणीचा डान्स व्हिडीओ व्हायरल (Viral Dance Video)  झाला आहे. हा डान्स व्हिडीओ अमिताभ बच्चन-धर्मेंद्र यांच्या सुपरहिट 'शोले' सिनेमाची आठवण करून देतो.

'शोले' सिनेमातील एक प्रसिद्ध डायलॉग आहे. 'बसंती, इन कुत्तों के सामने मत नाचना'. हा डायलॉगही आजही लोकप्रिय आहे. सोशल मीडियावर आयपीएस अधिकारी  रूपिन शर्मा याांनी एक मजेदार  (Funny Video) व्हिडीओ शेअऱ केला आहे. हा व्हिडीओ पाहून लोक नॉस्टॅल्जिक होत आहेत. या सिनेमातील गाण्यावर तरूणी कुत्र्यांसमोर नाचत आहे. (हे पण वाचा : नसला उद्योग! स्टंटच्या नादात केलं शेजाऱ्याचं मोठं नुकसान, व्हिडीओ झाला व्हायरल...)

ही तरूणी एका शांत रस्त्यावर कुत्र्यांसमोर डान्स करत आहे. बॅकग्राउंडला 'हा जब तक है जान, मैं नाचूंगी'  हे गाणं सुरू आहे. तरूणी आपल्या धुंदीत डान्स करत आहे आणि मजेदार बाब म्हणजे  तिच्या आजूबाजूचे कुत्रे तिला आश्चर्याच्या नजरेने बघत आहेत. कदाचित त्यांना प्रश्न पडला असेल की, ही तरूणी त्यांच्यासमोर डान्स का करत आहे.

हा व्हिडीओ पाहून लोक तरूणीची तुलना बसंतीसोबत करत आहे. या व्हिडीओला 'बसंती (Basanti) कुत्तों के सामने नाची..' असं कॅप्शन देण्यात आलं आहे. त्यामुळे लोकांना हा व्हिडीओ आणखीनच मजेदार वाटत आहे
 

Web Title: Funny video of girl dancing in front of dogs on street, basanti dance viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.