#JCBKiKhudayi नंतर जेसीबीचा नागिण डान्स व्हायरल; पाहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2019 04:50 PM2019-07-13T16:50:51+5:302019-07-13T16:52:59+5:30
सोशल मीडियावर कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल हे काही सांगता येत नाही. प्रिया प्रकाश वॉरियरची एक व्हिडीओ क्लिप एका रात्रीत व्हायरल आणि एका रात्रीत ती इंटरनेट सेन्सेशन झाली.
सोशल मीडियावर कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल हे काही सांगता येत नाही. प्रिया प्रकाश वॉरियरची एक व्हिडीओ क्लिप एका रात्रीत व्हायरल आणि एका रात्रीत ती इंटरनेट सेन्सेशन झाली. काही दिवसांपूर्वी अशीच एक गोष्ट व्हायरल झाली होती, ती म्हणजे JCBKiKhudai.अगदी तसाच #JCBKiKhudayi हा हॅशटॅग सोशल मीडियावर फार कमी वेळात व्हायरल झाला होता. विसरलात की काय? फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम सगळीकडे जेसीबी मशीनवर असलेले मीम्स आणि जोक्स व्हायरल झाले होते. असं सांगण्यात येतं की, या प्रकरणाती सुरुवात बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनी हिच्यापासून झाली होती.
खरं तर अभिनेत्री सनी लिओनीने जेसीबी मशीनच्या टायरवर चढून फोटो काढला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला आणि काही क्षणातच #JCBKiKhudayi हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड करू लागला. या हॅशटॅग वापरून अनेक मीम्स, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले होते. पण तुम्हाला माहीत आहे का? आता जेसीबीशी संबंधित आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये जेसीबी चक्क नागीण डान्स करताना दिसत आहेत. तुम्ही म्हणाल काहीही काय सांगता? असं कसं शक्य आहे? तुम्हाला विश्वास बसत नसेल तर हा व्हिडीओ पाहा...
पाहा व्हिडीओ :
thank you for not banning TikTok.#TikTok#ThursdayThoughtspic.twitter.com/W1Lf2hx1MA
— Krishna Bhatt (@thekrishnabhatt) July 11, 2019
दरम्यान या व्हिडीओवर अनेक यूजर्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. एका यूजरने म्हटलं आहे की, जेसीबीचा नागिण डान्स पाहून स्वतः नागिणंही हैराण होईल...
thank you for not banning TikTok.#TikTok#ThursdayThoughtspic.twitter.com/W1Lf2hx1MA
— Krishna Bhatt (@thekrishnabhatt) July 11, 2019
आणखी एका यूजरने असं म्हटलं आहे की, हसून हसून माझ्या पोटात दुखू लागलं आहे...
thank you for not banning TikTok.#TikTok#ThursdayThoughtspic.twitter.com/W1Lf2hx1MA
— Krishna Bhatt (@thekrishnabhatt) July 11, 2019
हा व्हिडीओ पाहणाऱ्या आणखी एका यूजरने असं लिहिलं आहे की, क्रिएटिव्हीटी म्हणजे काय हे पाहायचं असेल तर हा व्हिडीओ पाहा...
thank you for not banning TikTok.#TikTok#ThursdayThoughtspic.twitter.com/W1Lf2hx1MA
— Krishna Bhatt (@thekrishnabhatt) July 11, 2019
आतापर्यंत 40 हजारपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. दरम्यान #JCBKiKhudayi हा हॅशटॅग वापरून काही मीम्स व्हायरल झाले होते. पाहूयात काही मीम्स...
me and my homies watching "JCB KI KHUDAAI "#jcbkikhudayipic.twitter.com/y0XVIdImiT
— SAVAGEDADDY (@merawala_memer) May 27, 2019
When there is #jcb ki khudai in our area..
— chetan choudhary (@CK251998) May 28, 2019
Mean while babu bhaiya ...... 😂#jcbkikhudayipic.twitter.com/tBcKxy3VXJ
Bulldozer watching JCB trending. pic.twitter.com/K9gFOCQj68
— Godman Chikna (@Madan_Chikna) May 27, 2019