थर्माकोलच्या बॉक्सवर चादरींचे थर; थंडीपासून सुटका मिळवण्यासाठी पठ्ठ्याचा अनोखा जुगाड, Video व्हायरल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 16:10 IST2023-12-20T16:03:24+5:302023-12-20T16:10:45+5:30
थंडीपासून बचावाकरिता पठ्याचा अनोखा जुगाड पाहून कोणालाही हसू आवरणार नाही.

थर्माकोलच्या बॉक्सवर चादरींचे थर; थंडीपासून सुटका मिळवण्यासाठी पठ्ठ्याचा अनोखा जुगाड, Video व्हायरल...
Viral Video : सध्या देशभरात गुलाबी थंडीची चाहूल लागत आहे. पहाटेच्या दाट धुक्यामुळे हवेत गारवा जाणवू लागला आहे.त्यामुळे सकाळी किंवा रात्रीच्यावेळी बाहेर फिरताना काहीजण उबदार कपड्यांचा आधार घेतात.या गोठवणाऱ्या थंडीपासून स्वत: चे रक्षण करण्यासाठी लोक नानाविध उपाय करतात. वर्षभर कपाटात पडून राहिलेले स्वेटर्स,कानटोपी यावेळी बाहेर काढण्यात येते.
पण सोशल मीडियावर एका तरुणाने थंडीपासून स्वत: चे रक्षण करण्यासाठी केलेला उपाय चर्चेचा विषय ठरलाय. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसून गुदगुल्या होतील. सध्या या व्हायरल व्हिडीओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगतेय.
या व्हिडीओमध्ये थंडीपासून बचाव करण्यासाठी एका व्यक्तीने बॉक्स तयार केला आहे. या बॉक्सवर चादरींचे थर रचत त्याने स्वत: ला त्या बॉक्समध्ये पॅक करून घेतले आहे. व्हिडीओच्या शेवटी बॉक्स बंद करत ती व्यक्ती त्यात झोपी जाते. थंडीपासून बचाव करण्यासाठी या व्यक्तीने केलेला जगावेगळा जुगाड पाहून नेटकऱ्यांमध्ये एकच हशा पिकला आहे. याचा अंदाज नेटकऱ्यांची प्रतिक्रिया वाचून तुम्हाला येईलच.
व्हायरल होणारा व्हिडीओ ८० लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे. त्याव्यतिरिक्त नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर भन्नाट कमेंट्स देखील केल्या आहेत.
येथे पाहा व्हिडीओ :
— Figen (@TheFigen_) December 18, 2023