VIDEO : नवरदेवाने मंडपात नवरीसोबत केलं असं काही, पंडितजी म्हणाले - हात काढ....
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 05:13 PM2021-06-18T17:13:03+5:302021-06-18T17:15:29+5:30
आजकाल नवरी-नवरदेव लग्नाचे रितीरिवाज सुरू असताना बिनधास्त बोलतात किंवा गमती-जमती करताना दिसतात. अनेकदा तर हा फरकही करता येत नाही की, कपलचं लव्ह मॅरेज आहे की, अरेंज मॅरेज.
सोशल मीडियावर लग्नातील वेगवेगळ्या मजेदार क्षणांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. लग्नात सर्व पाहुणे आणि नातेवाईक असले की, वातावरण कसं आनंदाचं असतं. मजा-मस्तीनेच रिवाजांची रौनक वाढते. गमती-जमतीशिवाय लग्नात मजाच येणार नाही. अशाच एक मजेदार व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे.
आजकाल नवरी-नवरदेव लग्नाचे रितीरिवाज सुरू असताना बिनधास्त बोलतात किंवा गमती-जमती करताना दिसतात. अनेकदा तर हा फरकही करता येत नाही की, कपलचं लव्ह मॅरेज आहे की, अरेंज मॅरेज. व्हायरल झालेल्या व्हिडीओ नवरदेवाने चक्क नवरीच्या खांद्यावर हात ठेवला. बरं यावेळी सगळे नातेवाईक आजूबाजूला होते. (हे पण बघा : हाय गरमी! मिठाई चारून देताना असा चढला नवरीला पारा, लोक म्हणाले - जबरदस्ती लावलंय लग्न....)
इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ Trending Wedding Couples नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून हा अंदाज लावला जाऊ शकतो की, सगळेच आपसात गंमत करत आहेत. तेव्हाच पंडितजी नवरी पल्लवीला तिच्या नावाने हाक मारतात आणि मजेदार पद्धतीने नवरदेवाला नवरीच्या खांद्यावरून हात काढायला सांगतात.
पंडितजींनी असं म्हटल्यावर उपस्थित सगळेच हसू लागतात. काही लोक टाळ्या वाजवून पंडितजींच समर्थन करू लागतात. या व्हिडीओला आतापर्यंत अडीच हजार व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ हिमाचल प्रदेशातील असल्याचं समजतं.