डोक्यावर हेल्मेटऐवजी पातेलं ठेवून स्कूटी चालवत आहे महिला, व्हिडीओ व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 01:08 PM2024-11-05T13:08:26+5:302024-11-05T13:19:42+5:30

Funny Video: यात एका महिलेच्या डोक्यावर स्कूटी चालवताना हेल्मेटऐवजी पातेलं ठेवलेलं दिसत आहे.

Funny Video : Woman riding a scooter with a pot on head viral video | डोक्यावर हेल्मेटऐवजी पातेलं ठेवून स्कूटी चालवत आहे महिला, व्हिडीओ व्हायरल!

डोक्यावर हेल्मेटऐवजी पातेलं ठेवून स्कूटी चालवत आहे महिला, व्हिडीओ व्हायरल!

Funny Video: बाईक किंवा स्कूटर चालवताना हेल्मेट वापरण्याचा नियम हा सुरक्षेसाठी फार महत्वाचा नियम आहे. हेल्मेटमुळे अपघातावेळी डोक्याला गंभीर इजा होत नाही किंवा कमी होते. हेल्मेटबाबतचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. यात एका महिलेच्या डोक्यावर स्कूटी चालवताना हेल्मेटऐवजी पातेलं ठेवलेलं दिसत आहे. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील असल्याचं सांगण्यात येत आहे. 

व्हिडिओमध्ये बघू शकता की, एक महिला स्कूटी चालवताना दिसत आहे. मागून येणाऱ्या गाडीवर एका व्यक्तीने या महिलेचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. त्यात तुम्ही महिलेच्या डोक्यावर पातेलं बघू शकता. ज्याचा वापर किचनमध्ये वेगवेगळ्या कामांसाठी केला जातो. त्यामुळे हा गमतीदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेला हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @laughwith_mm19 नावाच्या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे आणि याच्या कॅप्शनला लिहिलं आहे की, 'हेल्मेट फार गरजेचं आहे'. या व्हिडिओला आतापर्यंत ८३ लाख ८४ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर ३ लाख ३२ हजारांपेक्षा जास्त लोकांनी व्हिडीओ लाइक केला आहे. 

तसेच लोक या व्हिडीओ अनेक गंमतीदार कमेंट्सही करत आहेत. एकाने लिहिलं की, "ताई...हेल्मेट कुठून खरेदी केला?". तर दुसऱ्याने लिहिलं की, "वाटतं...ताई घाईघाईत जेवण बनवायला जात आहे". तर तिसऱ्याने लिहिलं की, "आता मला समजलं की, माझ्या घरातील पातेलं कुठं गेलं".
 

Web Title: Funny Video : Woman riding a scooter with a pot on head viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.