बोंबला! ऑनलाईन सत्रातच सुरू राहिला वकिलाचा कॅमेरा; व्हिडीओ पाहताच सॅलिसिटर जनरल म्हणाले.....
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2021 01:02 PM2021-03-07T13:02:14+5:302021-03-07T13:11:13+5:30
Trending Viral Video in Marathi : या व्हिडीओमध्ये एक वकील कोर्टाच्या ऑनलाईन सत्रादरम्यान (Virtual Session of Court) हातामध्ये ताट घेऊन भोजनाचा आनंद घेत आहे.
गेल्या एका वर्षापासून कोरोना व्हायरसच्या माहामारीमुळे लॉकडाऊन लागलं. त्यानंतर सगळ्यांनाच घरून काम करण्याशिवाय पर्याय नव्हता अशा स्थितीत ऑनलाईन मिटिंग्सचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले. त्यातील काही कॉल्स हे ट्विटरवर ट्रेंडही झाले. कारण ऑनलाईन मिटिंग्सची सवय नसल्यानं अनेकांकडून चुका झाल्या.
तर काही व्हिडीजनी सोशल मीडियावर धुमाकुळ घातलेला पाहायला मिळाला. या व्हिडीओमध्ये एक वकील कोर्टाच्या ऑनलाईन सत्रादरम्यान (Virtual Session of Court) हातामध्ये ताट घेऊन भोजनाचा आनंद घेत आहे. मात्र, आपला कॅमेरा सुरूच असल्याची कल्पना या वकीलाला नाही. हा मजेशीर व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल होत आहे.
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 pic.twitter.com/UBj9maFb2Z
— Mayur Sejpal | मयूर सेजपाल 🇮🇳 (@mayursejpal) March 5, 2021
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता उच्च न्यायालयाचे एक वकील आपल्या हातामध्ये जेवणाची थाळी घेऊन कॉमप्यूटर समोर बसले आहेत. तर, यातच स्क्रीनवर भारताचे सॉलिसीटर जनरल (Solicitor General of India) तुषार मेहताही दिसत आहेत. या व्हिडीओमधील वकीलांचं नाव श्रत्रशाल राज (Kshatrashal Raj) असं असून अजूनही मेहता कॉलवर आहेत, याची त्यांना कल्पना नाही आणि ते हातात थाळी घेऊन जेवण करत आहेत. याला म्हणतात डोकं! पठ्ठ्यानं जुन्या साडीपासून २ मिनिटात बनवली लांबच लांब दोरी; पाहा व्हिडीओ
आपल्या कॉलवर त्यांनी आवाज म्यूट केलेला आणि कॅमेरा सुरू ठेवलेला दिसून येत आहे. ही बाब लक्षाच येताच राज यांनी आपल्या हातातील प्लेट ताबडतोब खाली ठेवत कॅमेरा बंद करण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडीओ पाहून यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. मेहता यात 'यहाँ भेजो' म्हणजेच आम्हाला जेवण पाठवा, असं म्हणताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. बापरे बाप डोक्याला ताप! पत्नीसाठी तो विजेच्या खांबावर चढला अन् पोलिसांनी पाय धरून खाली खेचला...