School Girl Video: चिमुरडीचे बोबडे बोल, निरागसपणे म्हणाली- 'स्कूल चले हम', Video पाहून तुम्हीही म्हणाल So Cute!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2022 09:19 PM2022-12-25T21:19:20+5:302022-12-25T21:20:14+5:30

लहान मुलीचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे

Funny viral video trending on social media google trends little girl innocently says school chale hum wins heart watch | School Girl Video: चिमुरडीचे बोबडे बोल, निरागसपणे म्हणाली- 'स्कूल चले हम', Video पाहून तुम्हीही म्हणाल So Cute!

School Girl Video: चिमुरडीचे बोबडे बोल, निरागसपणे म्हणाली- 'स्कूल चले हम', Video पाहून तुम्हीही म्हणाल So Cute!

googlenewsNext

School Girl Video: लहानपणी शाळेत जायचं म्हटलं की बहुतेक जण मला शाळेत जायचं नाही असे ओरडायला लागायचे. शाळेचा पहिला दिवस हा प्रत्येक मुला-मुलीसाठी खूपच महत्त्वाचा असतो. काही वेळा मुलं रडतात, तर काही हसत-हसत पालकांना टाटा-बाय बाय करून शाळेत जातात. सध्या असाच एक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत तुम्हाला एक लहान मुलगी दिसत आहे, ती किती आनंदाने शाळेत जातेय ते दिसतंय. आपल्या आई-बाबांपासून थोडा वेळ दूर राहावं लागणार याची तिला अजिबातच अडचण नाहीये. ती अजिबात रडत नाहीये.

जेव्हा त्या मुलीला विचारले जाते की तू शाळेत जात आहेस का? तेव्हा ती खूप गोंडस शब्दात म्हणते की- हो, मी शाळेत जात आहे. मुलीच्या या निरागस आणि गोंडस स्टाईलच्या लोक प्रेमात पडत आहेत. आपका प्यारा राजकुमार (@kapyara_rajkumar) नावाच्या हँडलने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हायरल क्लिपमध्ये जेव्हा तिचे वडील बॅग लटकवलेल्या मुलीला एकदा बोलण्यास सांगतात तेव्हा ती निरागसपणे म्हणतो की मी शाळेत जात आहे. यानंतर, जेव्हा ते तिला 'स्कूल चले हम' म्हणायला सांगतात तेव्हा ती चिमुरडी देखील खूप गोंडसपणे बोबडं बोलत म्हणते- 'स्कूल चले हम.'

इंस्टाग्रामवर व्हायरल झालेला हा व्हिडिओ नेटिझन्सना चांगलाच आवडला आहे. आतापर्यंत पाच लाखांहून अधिक लोकांनी या क्लिपला लाईक केले असून शेकडो युजर्सनी कमेंट केल्या आहेत.

Web Title: Funny viral video trending on social media google trends little girl innocently says school chale hum wins heart watch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.