ट्रकच्या मागे लिहिली होती एक गमतीदार सूचना, वाचून पोटधरून हसाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 16:57 IST2024-09-02T16:39:06+5:302024-09-02T16:57:10+5:30
Viral Video : सोशल मीडियावर सध्या एका ट्रकमागचा असाच मजेदार मेसेज व्हायरल झाला आहे. जो वाचून लोक लोटपोट होऊन हसत आहेत.

ट्रकच्या मागे लिहिली होती एक गमतीदार सूचना, वाचून पोटधरून हसाल!
Viral Video : ट्रक किंवा वेगवेगळ्या गाड्यांवर मागे लिहिलेले मेसेजेस नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. कधी गाड्यांवर रोमॅंटिक गोष्टी लिहिलेल्या असतात तर कधी काही मजेदार गोष्टी लिहिलेल्या असतात. काही मेसेजेस तर इतके फनी असतात की, पोटधरून हसायला येतं. सोशल मीडियावर सध्या एका ट्रकमागचा असाच मजेदार मेसेज व्हायरल झाला आहे. जो वाचून लोक लोटपोट होऊन हसत आहेत.
रस्त्यावर गाडी चालवत असताना सतर्क आणि एकाग्र राहणं फार गरजेचं असतं. तुमची छोटीशी चूक तुमच्या जीवावर बेतू शकते. हे समजावून सांगण्यात एका ट्रकमागे काही ओळी लिहिल्या आहेत. मात्र, हा मेसेज इतका गमतीदार आहे की, लोक तो वाचून पोटधरून हसत आहेत. ट्रकच्या मागे लिहिलं आहे की, "वाहन चलाते समय सौंदर्य दर्शन न करें, वरना देव दर्शन हो सकते हैं." दुसरीकडे लिहिलंय की, "सावधानी हटी सब्जी पूरी बटी." या पोस्टच्या कमेंट्स सेक्शनमध्ये लोक अनेक मजेदार कमेंट्स करत आहेत.
रस्त्यावर गाडी चालवताना दुर्घटना टाळण्यासाठी देण्यात आलेल्या हा गमतीदार अंदाज लोकांना खूपच आवडला आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. इन्स्टाग्रामवर आतापर्यंत या व्हिडिओला ३९ कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर चार लाखांपेक्षा जास्त लोकांनी व्हिडीओ लाइक केला आहे. तर ५.७ लाख लोकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.