भूत कि अदृश्य शक्ती? नेमका कोणी केला त्या माणसावर हल्ला? जिमच्या सीसीटीव्हीत 'ते' भयानक दृश्य कैद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 12:11 PM2021-08-20T12:11:09+5:302021-08-20T12:12:09+5:30

एखाद्या हॉरर फिल्ममधील भयानक दृश्यं वाटावं अशीच घटना प्रत्यक्षात घडली आहे (Real ghost). एक खरा हॉरर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे.

ghost in gym cctv camera records video goes viral | भूत कि अदृश्य शक्ती? नेमका कोणी केला त्या माणसावर हल्ला? जिमच्या सीसीटीव्हीत 'ते' भयानक दृश्य कैद

भूत कि अदृश्य शक्ती? नेमका कोणी केला त्या माणसावर हल्ला? जिमच्या सीसीटीव्हीत 'ते' भयानक दृश्य कैद

Next

तुम्ही बऱ्याच हॉरर फिल्म पाहिल्या असतील किंवा सोशल मीडियावर भूताचे व्हिडीओही पाहिले असतील. ते पाहताना अंगाला दरदरून घाम फुटतो. एखाद्या हॉरर फिल्ममधील भयानक दृश्यं वाटावं अशीच घटना प्रत्यक्षात घडली आहे (Real ghost). एक खरा हॉरर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. ज्यामध्ये जीममध्ये एका व्यक्तीवर भूत म्हणा किंवा एखाद्या अदृश्य शक्तीने हल्ला केल्याचं दिसतं आहे. हा व्हिडीओ पाहताच धडकी भरेल.

व्हिडीओत पाहू शकता एक तरुण जीममध्ये आला आहे. तो जीम करण्यासाठी तयार होतो आहे. जिममध्ये तो एकटाच दिसतो आहे. अचानक त्याच्या मागे असलेलं TRX सस्पेंशन आपोआप मागे पुढे होताना दिसतं. या व्यक्तीला याबाबत माहिती नाही आहे, त्याचं तिथं लक्षच नाहीय. त्यानंतर तो दुसऱ्या ठिकाणी जातो तिथं एक भलामोठा बॉल आपोआप हलताना दिसतो तेव्हा तो तरुण दचकतो. तो घाबरून आपली बॅग उचलतो आणि पळण्याचा प्रयत्न करतो. तो जसा दरवाज्याच्या दिशेने धावू लागतो तसा तो जमिनीवर पडतो. कुणीतरी त्याचा एक पाय धरून त्याला खेचतानाही दिसत आहे. कसंबसं करून तो तरुण त्या अदृश्य शक्तीच्या तावडीतून सुटतो आणि आपलं सामान तिथंच टाकून तो तिथून धूम ठोकतो.

हा व्हिडिओ Johanna यांनी ट्वीटरवर शेअर केला आहे. याला आतापर्यंत लाखो व्हिव्ज मिळाले आहेत. हे नक्की भूत आहे की पॅरानॉमल अ‍ॅक्टिव्हिटी हे समजलेलं नाही. कदाचित हा सोशल मिडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेला फेक व्हिडिओही असू शकतो.

 

Web Title: ghost in gym cctv camera records video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.