VIDEO : स्कूटीच्या आत लपून बसला होता खतरनाक किंग कोब्रा आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2022 03:34 PM2022-11-04T15:34:55+5:302022-11-04T15:36:16+5:30
King Cobra : अविनाशने सापाला स्कूटीतून ज्याप्रकारे बाहेर काढलं ते खरंच खूप हिंमतीचं काम आहे. कारण त्याच्या हातात सापांना पकडण्यासाठी वापरली जाणारी स्टीकही नव्हती.
King Cobra : स्कूटीच्या आत एक खतरनाक साप लपून बसल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओत एक व्यक्ती त्या सापाला बाहेर काढताना दिसत आहे. इन्स्टावर हा व्हिडीओ अविनाश यादवने शेअर केला आहे. अविनाशच्या इन्स्टा बायोनुसार, तो सापांच्या प्रजातींबाबत पोस्ट शेअर करत असतो.
अविनाशने सापाला स्कूटीतून ज्याप्रकारे बाहेर काढलं ते खरंच खूप हिंमतीचं काम आहे. कारण त्याच्या हातात सापांना पकडण्यासाठी वापरली जाणारी स्टीकही नव्हती. अविनाशने व्हिडीओत सांगितलं की, हे रेस्क्यू ऑपरेशन सकाळी 5 वाजता केलं. अविनाशने गंमतीने लिहिलं की, स्कूटीच्या मालकाला झेड प्लस सिक्युरिटी मिळाली आहे.
व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, किंग कोब्रा साप पांढऱ्या रंगाच्या अॅक्टिवा गाडीच्या मागच्या बाजूस आहे. गाडीचा पुढील भाग खोलून सापाला बाहेर काढण्यात आलं. अविनाशच्या हाती पेचकच आहे. ज्याने त्याने गाडी उघडली.