व्हेल माशाचं असं रूप पाहून अवाक् झाले लोक, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2019 03:12 PM2019-09-03T15:12:33+5:302019-09-03T15:17:43+5:30
व्हेल मासा आज एक दुर्मिळ प्रजाती झाली आहे. असंही होऊ शकतं की, येणाऱ्या काळात यांचं केवळ नावच ऐकायला मिळेल.
व्हेल मासा आज एक दुर्मिळ प्रजाती झाली आहे. असंही होऊ शकतं की, येणाऱ्या काळात यांचं केवळ नावच ऐकायला मिळेल. दुसरीकडे अनेक संस्था व्हेल वाचण्यासाठी प्रयत्न करत आहेत. Whale Watchers Sydeny नावाने एक फेसबुक पेज आहे. त्यांनी काही खास आणि आश्चर्यकारक फोटो-व्हिडीओ शेअर केले आहेत. लोक व्हेल माशांना बघण्यासाठी या उपक्रमासोबत जुळतात.
एका बोटमध्ये या उपक्रमांतर्गत काही लोक समुद्रात व्हेल बघण्यासाठी गेले होते. वातावरण बिघडलेलं होतं. अशाच अचानक एक व्हेल मासा पाण्यातून वर आला आणि कर्तब दाखवू लागला.
असं फार कमी वेळ होतं की, व्हेल मासा असं करेल. हा व्हेल मासा ९० मिनिटांपर्यंत असाच पाण्यात आत-बाहेर करत होता. त्याचेच व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरले आहेत.
असंही मानलं जातं की, अनेकदा तरूण व्हेल इतर व्हेल माशांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी असं करतात. पण याबाबत काहीही ठोस पुरावा नाही.
एका व्हेल माशाची लांबी ६० फुटापर्यंत असू शकते. तर वजन ४० टनांपेक्षाही अधिक असू शकतं.