VIDEO : समोरच्या डबक्यातील पाणी पिऊ शकत नव्हता जिराफ, बघा त्याने कशी भागवली त्याची तहान!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 03:28 PM2021-04-03T15:28:25+5:302021-04-03T15:34:47+5:30
एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात एक जिफार आहे. या जिराफाला तहान लागली आहे. पण समोरच्या डबक्यातील पाणी तो पिऊ शकत नाहीये.
निसर्गाने वेगवेगळ्या जीवांना वेगवेगळ्या खासियत दिल्या आहेत. मनुष्याला तर निसर्गाने सर्वात बुद्धीमान बनवलं. काही प्राण्यांना फारच सुंदर केलं. पण काही प्राण्यांची सुंदरता किंवा त्यांची रचना त्यांच्यासाठी अभिषाप आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात एक जिफार आहे. या जिराफाला तहान लागली आहे. पण समोरच्या डबक्यातील पाणी तो पिऊ शकत नाहीये. तर तिथे असलेले इतर प्राणी आरामात पाणी पिताना दिसत आहेत.
जिराफ अनेकदा पाणी पिण्याचा प्रयत्न करतो. पण त्याची लांबलचक मान पाण्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये. याचं कारण म्हणजे जिराफाचे पुढचे दोन पाय जास्त लांब असतात आणि मागचे पाय लहान असतात. ज्यामुळे तो उंच झाडावरील पाने सहज खाऊ शकतो. पण खालची वस्तू सहज उचलू शकत नाही. त्यामुळेच जिऱाफ सहज पाणी पिऊ शकत नाहीये.
व्हिडीओत तुम्ही बघू शकता की जिराफ पुन्हा पुन्हा पाणी पिण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्याचं तोंड तिथपर्यंत पोहोचत नाहीये. अशात तो एक शक्कल लढवतो. तो समोरचे दोन्ही पाय स्ट्रेच करतो आणि मग पाणी पितो. पण यासाठीही त्याला अनेक प्रयत्न करावे लागता. मात्र, तो त्याची तहान भागवण्यासाठी सतत प्रयत्न करतो. अखेर तो त्याची तहान भागवतो.