'या' तरुणीला बिल्डींगच्या टॉपवर फोटो काढण्याचा आहे छंद, फोटो पाहून व्हाल अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2019 11:23 AM2019-04-13T11:23:54+5:302019-04-13T11:28:22+5:30
हे फोटो Angela Nikolau चे आहेत. तुम्ही म्हणाल तिचं काय कौतुक? तर या मुलीला ना एक वेगळीचा छंद आहे.
(Image Credit : Daily.Social)
हे फोटो Angela Nikolau चे आहेत. तुम्ही म्हणाल तिचं काय कौतुक? तर या मुलीला ना एक वेगळीचा छंद आहे. तिला जगातल्या सर्वात उंच इमारतींवर फोटो काढण्याचा छंद आहे. तसा तर हा आज एक ट्रेन्ड झाला आहे. याला Rooftopping असं म्हणतात. अनेकांना यात आपला जीवही गमवावा लागला आहे. अनेकदा असं होतं की, उंच कुठेतरी मोठ्या मुश्किलीने चढतात पण उतरु शकत नाहीत. मग पडतात आणि मरतात.
पण Angela अशा घटनांच्या बातम्या वाचून घाबरत नाही. ती हिंमत करुन हे सगळं करते. Angela ने जगभरात प्रवास करुन वेगवेगळ्या ठिकाणी उंच इमारतींवर फोटो काढले आहेत. तिचे हे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
Angela एका सर्कसमध्ये काम करते. तिला स्टंट्स करण्याची अजिबात भीती वाटत नाही. तिचे वडील मॉस्कोतील एका सर्कसमध्ये काम करत होते. त्यामुळे बालपणापासूनच तिच्या वडिलांनी तिला असे कारनामे करण्यासाठी तयार केले आहे.
Angela चं २६ वर्ष आहे. ती सांगते की, तिला बालपणापासूनच उंची पसंत आहे. ती सांगते की, जेव्हा तिच्या आजीला हे कळालं की, ती असे काहीतरी धक्कादायक प्रकार करते तेव्हा ती घाबरली होती. पण तिने आजीला हे सांगितलं की, हे फोटो एडिट केले आहेत.
Angela उंच इमारतीच्या टोकावर जाऊन केवळ फोटो काढते असं नाही तर तिथे ती योगाही करते. पण तुम्ही हे अजिबात हे ट्राय करु नका. कारण Angela ने याचं बालपणापासून ट्रेनिंग घेतलं आहे. तिला तिच्या शरीराच्या क्षमता माहिती आहेत.