मोठ्या ऐटीत तोंडाचं पाऊटं करुन माकडासोबत फोटो काढत होती, माकडानं केला असा हल्ला की...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 16:51 IST2021-09-28T16:50:34+5:302021-09-28T16:51:49+5:30
तरुणीचा माकडासोबतचा सेल्फी काढण्याचा प्रयत्न तिच्या जीवावरच बेतला असता. तोंडाचं पाऊट करुन ती सेल्फी काढायला गेली खरी पण त्यानंतर माकडाने तिच्यासोबत जे केलं ते पाहून तुम्ही हादराल.

मोठ्या ऐटीत तोंडाचं पाऊटं करुन माकडासोबत फोटो काढत होती, माकडानं केला असा हल्ला की...
कुठे फिरायला गेलो की फोटो काढणं आलंच. बहुतेक पर्यटनस्थळी माकडं (Monkey) असतात. त्यामुळे या माकडांसोबत अनेकजण फोटो किंवा सेल्फी काढतात. मात्र एका तरुणीचा माकडासोबतचा सेल्फी काढण्याचा प्रयत्न तिच्या जीवावरच बेतला असता. तोंडाचं पाऊट करुन ती सेल्फी काढायला गेली खरी पण त्यानंतर माकडाने तिच्यासोबत जे केलं ते पाहून तुम्ही हादराल.
व्हिडीओत पाहू शकता तरुणी माकडाजवळ जाऊन फोटोसाठी पोझ देऊन उभी राहते. तिची मैत्रीण समोरून तिचा फोटो काढते आहे. माकडाच्या जवळ ती जाते आणि आपली दोन बोटं दाखवत पाऊट करते. माकड तिच्याकडे पाहतं आणि तिच्यावर उडी घेतं. तिच्या खांद्यावर बसतं, तिचं नाक-तोंड दाबतं, केस खेचण्याचाही प्रयत्न करते. तरुणी किती तरी वेळ माकडाच्या तावडीतून सुटण्यासाठी धडपड करते. पण माकडाने तिला इतकं घट्ट पकडलं आहे की तिला त्याच्या तावडीतून सुटताच येत नाही.
सुदैवाने माकडाला बांधलेलं आहे आणि तरुणीने आपल्या डोक्याभोवती स्कार्फ गुंडाळलेला होता. पण तरी माकडाने असा अचानक हल्ला केल्याने ती जबरदस्त घाबरली आहे. videolucu.funny इन्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
काही दिवसांपूर्वीच असाच माकडासोबत सेल्फी घेणाऱ्या तरुणाचाही व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये माकडाने त्या तरुणावर असाच हल्ला केला होता.