गाणं वाजवत आली कचरा गोळा करणारी गाडी, चिमुकलीचा डान्स बघून चेहऱ्यावर फुलेल हसू!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 11:30 AM2023-11-14T11:30:57+5:302023-11-14T11:31:15+5:30

Viral Video : सध्या एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात कचरा गाडी येते आणि एक लहान मुलगी तिच्या घरासमोर डान्स करू लागते.

Girl dance on gadi wala aaya ghar se kachra nikal song on road viral video | गाणं वाजवत आली कचरा गोळा करणारी गाडी, चिमुकलीचा डान्स बघून चेहऱ्यावर फुलेल हसू!

गाणं वाजवत आली कचरा गोळा करणारी गाडी, चिमुकलीचा डान्स बघून चेहऱ्यावर फुलेल हसू!

Viral Video : आधी जेव्हा घरांबाहेर कचरा गोळा करणारा येत होता तेव्हा तर ते आल्यावर कुणाला काही कळत नव्हतं. आता घरोघरी कचरा गोळा करणारी गाडी येते. ज्यावर खास गाणी वाजतात. जी आजकाल सगळ्यांना तोंडपाठही झाली आहेत. या गाण्याच्या आवाजाने लोक जागेही होतात आणि कचरा फेकायला बाहेर निघतात. इतकंच काय या गाण्यांवर रील्सही बनवले गेले आहेत. सध्या एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात कचरा गाडी येते आणि एक लहान मुलगी तिच्या घरासमोर डान्स करू लागते. व्हिडीओ फारच क्यूट आहे आणि लोकांना खूप आवडत आहे.

इन्स्टाग्राम अकाउंट @youngbitesofficial वर नुकताच हा व्हि़डीओ पोस्ट करण्यात आलाय. जो भारतातील एका शहरातील आहे. व्हिडीओ एका गल्लीतील आहे. जिथे एक कचरा गोळा करणारी गाडी येताना दिसते. व्हिडिओत एक कचरा गोळा करणारी गाडी आहे. काही वर्षाआधी जेव्हा हे गाणं रिलीज झालं होतं. तेव्हा फारच गाजलं होतं. लोक गमतीने गाणं गात होते. आता तर सगळ्यांना हे गाणं तोंडपाठ झालं आहे.

व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, जशी गाणं गात गाडी येते ते ऐकून लहान मुलगी डान्स करू लागते. आजूबाजूचे लोक गाडीत कचरा टाकण्यासाठी येतात, ते मुलीला डान्स करताना पाहून हसतात. हा फारच क्यूट नजारा आहे.

या व्हिडिओला 61 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. तर शेकडो लोकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत. एकाने कमेंट केली की, जेव्हाही गाडी येते सगळेजण आपल्या रूममध्ये हेच काम करतात. दुसरा म्हणाला की, मुलांना अशीच मजा करू द्यावी, 10वी नंतर तर केवळ स्ट्रगलिंग लाईफ आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच गाजत आहे.

Web Title: Girl dance on gadi wala aaya ghar se kachra nikal song on road viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.