सावधान! नेलपेंट रिमूव्हरचा वापर करणं मुलीच्या बेतलं जीवावर; घडला धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2024 12:36 PM2024-02-02T12:36:52+5:302024-02-02T12:42:53+5:30
नेलपेंट रिमूव्हर वापरणं एका मुलीच्या जीवावर बेतलं आहे. तिच्यासोबत जे घडलं ते ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसेल.
मुलांसोबत अनेकदा काही धक्कादायक घटना घडत असतात. अशीच एक भयंकर घटना आता समोर आली आहे. नेलपेंट रिमूव्हर वापरणं एका मुलीच्या जीवावर बेतलं आहे. तिच्यासोबत जे घडलं ते ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसेल. अमेरिकेतील ओहायोमध्ये ही घटना घडली. एक मुलगी नेलपेंट रिमूव्हर लावताना भाजली गेली. उपचारासाठी तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.
एका रिपोर्टनुसार, ओहायो येथील केनेडी ही 14 वर्षांची मुलगी आपल्या घरी होती. तिला तिच्या चीअरलीडिंग टीमसोबत बास्केटबॉल खेळायचं होतं. यासाठी ती नेलपेंट रिमूव्हरने नेलपेंट काढत होती. मात्र याच दरम्यान तिच्या जवळच एक मेणबत्ती जळत होती. मात्र ती मेणबत्ती तिच्यासाठी धोकादायक ठरेल हे तिला माहीत नव्हतं. तिने नेलपेंट रिमूव्हरची बाटली बेडवर ठेवली असता तिच्या हातातील बाटलीचा स्फोट झाला. यामुळे आग लागली .
केनेडीचा हात यामध्ये भाजला गेला. तसेच आजूबाजूच्या वस्तूही जळून खाक झाल्या. केनेडीने दिलेल्या माहितीनुसार, "मी चीअरलीडिंग ड्रेस कोडमुळे नेलपेंट काढत होती. जवळच एक मेणबत्ती जळत होती. जेव्हा मी रिमूव्हरची बाटली बेडवर ठेवायला गेली, तेव्हा माझ्या हातात बाटलीचा स्फोट झाला. आजूबाजूच्या सर्व गोष्टींना पण आग लागली."
घाबरलेल्या केनेडीने किंचाळायला सुरुवात केली, ज्यामुळे घरात उपस्थित असलेले तिचे भाऊ-बहीण घाबरले. केनेडीचे आई-वडीलही घरी होते. भावंडं घराबाहेर पळत आले आणि मदतीसाठी 911 वर कॉल केला. "माझ्यासोबत यापूर्वी असं कधीच घडलं नव्हतं. मला खूप विचित्र वाटत होतं. खूप तीव्र वेदना होत होत्या" असं केनेडीने सांगितलं आहे.