VIDEO : विजेच्या तारांवर लटकून तरुणीचा 'हाय व्होल्टेज' ड्रामा, ८०० घरांमधील बत्ती गुल!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 11:33 AM2024-11-27T11:33:08+5:302024-11-27T11:52:37+5:30
Viral Video : एक तरूणी छोटे कपडे घालून विजेच्या मोठाल्या तारांवर आणि खांबावर चढताना दिसली. या तरूणीच्या कारनाम्यामुळे या भागातील ८०० घरातील वीज गेली होती.
Viral Video : सोशल मीडियावर असे व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात ज्यात एखादी व्यक्ती पाण्याची टाकीवर किंवा एखाद्या टॉवरवर चढून काही मागण्या करतात. अशाच एका तरूणीचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. महत्वाची बाब म्हणजे हा व्हिडीओ भारतातील नसून अमेरिकेतील आहे. एक तरूणी छोटे कपडे घालून विजेच्या मोठाल्या तारांवर आणि खांबावर चढताना दिसली. या तरूणीच्या कारनाम्यामुळे या भागातील ८०० घरातील वीज गेली होती.
इन्स्टाग्रामवर वश इलेक्ट्रिक 24 7 यूकेए ने हा व्हिडीओ शेअर केला आहे. असा दावा करण्यात आला आहे की, हा व्हिडीओ यूएसएमधील आहे. ज्यात एक तरूणी विजेच्या तारांवर उभी आहे. ती ट्रांसफार्मरच्या आधाराने उभी आहे. काही वेळातच ती विजेच्या एका तारावर लटकते. व्हिडिओच्या कॅप्शननुसार, हा व्हिडीओ अमेरिकेच्या सॉल्ट लेक सिटीतील आहे. तिच्या या कारनाम्यामुळे परिसरातील ८०० घरातील वीज सेवा बंद पडली होती.
हा व्हिडीओ पाहिल्यावर अनेकांनी या तरूणीवर राग व्यक्ती केला आहे. त्यांचं मत आहे की, या तरूणीने अनेक लोकांना त्रास झाला. एका यूजरने लिहिलं की, 'पॉवर बंद करायला नको होती'. दुसऱ्याने लिहिलं की, 'शॉक द्यायला हवा होता'. तर तिसऱ्याने लिहिलं की, 'हा देशात वाढलेल्या फ्रस्ट्रेशनचा भाग आहे'.