VIDEO : नवरीच्या गेटअपमध्ये प्रेयसीच्या लग्नात गेला होता प्रियकर, नातेवाईकांनी धरलं आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 12:23 PM2022-01-13T12:23:46+5:302022-01-13T12:26:31+5:30
Viral Video : एका तरूणाने महिलेचा गेटअप केला आणि आपल्या गर्लफ्रेन्डच्या घरात घुसला. यावेळी गर्लफ्रेन्डचं लग्न सुरू होतं. तरूणीचा एक्स तिला भेटालया तिच्या घरी गेला होता.
Viral Video : प्रेमात काही लोक कधी कधी असं काही करून बसतात, ज्याचा आपण कधी विचारही करत नाही. प्रेम आंधळं असतं हे सर्वांनीच ऐकलं असेल, पण हे सत्य ठरवणारेही काही लोक आहेत. अशीच एक घटना उत्तर प्रदेशच्या भदोही जिल्ह्यातून समोर आली आहे. एका तरूणाने महिलेचा गेटअप केला आणि आपल्या गर्लफ्रेन्डच्या घरात घुसला. यावेळी गर्लफ्रेन्डचं लग्न सुरू होतं. तरूणीचा एक्स तिला भेटालया तिच्या घरी गेला होता.
मात्र, तरूणीच्या घरातील लोकांना त्याच्यावर संशय आल्याने त्याचा भांडाफोड झाला. तरूणीच्या कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी त्याचा पाठलाग केला आणि त्याला पकडलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओत तरूण लाल साडीत, विग, बांगड्या, दागिने घालून दिसत आहे आणि त्याने मेकअपही केलं आहे. हा तरूण पूर्णपणे नवरीसारखा सजून आला होता. तरूणीचं काही वेळात लग्न होणार होतं, तेव्हा हा तरूण तिला भेटायला आला होता.
व्हिडीओत बघू शकता की, तरूणाच्या आजूबाजूला काही लोक उभे आहेत. जे रागात दिसत आहे. काही लोक तरूणाच्या तोंडावरून पदर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. पण तो त्यांना अडवताना दिसत आहे.
सुरूवातीला तरूणाला वाटलं की, महिलेच्या गेटअपमध्ये गेल्यावर तो सहजपणे तरूणीच्या रूममध्ये जाऊ शकेल. पण तसं काही झालं नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कुटुंबियांनी पोलिसांना याची सूचना देण्याआधीच तरूण त्याच्या दोन मित्रांसोबत तेथून पसार झाला.