गर्लफ्रेंड म्हणाली, "आईला तू पसंत आहेस"; बॉयफ्रेंडचे उत्तर पाहून तुम्हीही हसाल, व्हॉट्सॲप चॅट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 03:27 PM2024-02-12T15:27:54+5:302024-02-12T15:28:13+5:30

अलीकडे एका व्हॉट्सॲप चॅटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुमच्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य नक्कीच फुलेल.

girl massage lover mom like you but boy funny reply goes viral whatsapp chat | गर्लफ्रेंड म्हणाली, "आईला तू पसंत आहेस"; बॉयफ्रेंडचे उत्तर पाहून तुम्हीही हसाल, व्हॉट्सॲप चॅट व्हायरल

गर्लफ्रेंड म्हणाली, "आईला तू पसंत आहेस"; बॉयफ्रेंडचे उत्तर पाहून तुम्हीही हसाल, व्हॉट्सॲप चॅट व्हायरल

सोशल मीडियावर कधी आणि काय व्हायरल होईल, हे सांगता येत नाही. सोशल मीडियावर कधी काही पोस्ट्स तुम्हाला धक्का देणाऱ्या असतात. तर कधी काही पोस्ट तुम्हाला हसवून आनंद देणाऱ्या असतात. अलीकडे, अशाच एका व्हॉट्सॲप चॅटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुमच्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य नक्कीच फुलेल. सध्या, एका जोडप्याचा कथित चॅट सोशल मीडिया युजर्सना हसवून आनंद देत आहे.

या व्हायरल होत असलेल्या पोस्टमधील चॅट पाहता हे प्रेमीयुगुलांमधील असल्याचा अंदाज बांधता येतो. या व्हॉट्सॲप चॅटच्या स्क्रीनशॉटमध्ये मुलगी संबंधीत मुलाला सांगत आहे की, तिच्या आईने त्याला पसंत केले आहे. यावर तो मुलगा गमतीने उत्तर देतो, "आंटीला नकार दे रिया...मी फक्त तुझ्याशीच लग्न करेन." या संभाषणाचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. मुलाच्या उत्तराचा आनंद घेत युजर्सने अनेक कंमेट्स केल्या आहे. 

ही पोस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर (X) @D4Dramatic नावाच्या अकाऊंटसह शेअर करण्यात आली आहे. ही पोस्ट खूप व्हायरल होत असून तिला जास्त व्ह्यूज आणि लाईक्स मिळाल्या आहेत. पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'राहुल कधीही आपले वचन मोडणार नाही.' ही पोस्ट आतापर्यंत 2 लाख 25 हजारांहून अधिक लोकांनी पाहिली आहे, तर 5 हजारांहून अधिक लोकांनी या पोस्टला लाईक केले आहे. युजर्स पोस्टवर वेगवेगळ्या कंमेट्स करत आहेत. एका यूजरने लिहिले की, 'राहुल नॉटी है.'  तर दुसऱ्या यूजरने लिहिले की, 'भाई मजा आली.'

Web Title: girl massage lover mom like you but boy funny reply goes viral whatsapp chat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.