जे बात! तरूणीने एकटीने 6 तरूणांची केली धु-धु धुलाई, एकटीला पाहून देत होते त्रास
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 15:26 IST2022-06-15T15:24:03+5:302022-06-15T15:26:13+5:30
Girl Fighting Video: सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात काही तरूण एका तरूणीची छेड काढतात. पण तरूणी या तरूणांना सडेतोड उत्तर देते.

जे बात! तरूणीने एकटीने 6 तरूणांची केली धु-धु धुलाई, एकटीला पाहून देत होते त्रास
Girl Fighting Video: दुर्दैवाने दररोज लाखो महिलांवर वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार केले जातात. गुन्हेगारांपासून वाचण्यासाठी महिलांना नेहमीच अभ्यास आणि आत्मसुरक्षा करण्यासाठी शिक्षण घेण्यास सांगितलं जातं. तरीही आजकालच्या तरूणी हुशार झाल्या आहेत आणि आपल्या पद्धतीने अडचणीतून बाहेर पडणं त्यांना येतं. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात काही तरूण एका तरूणीची छेड काढतात. पण तरूणी या तरूणांना सडेतोड उत्तर देते.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला असून यात एक बहादूर तरूणी तिला 6 त्रास देणाऱ्या आणि धमकावणाऱ्या 6 तरूणांना धडा शिकवताना दिसत आहे. व्हिडीओत दिसतं की, 6 तरूण एका तरूणीला पकडतात आणि तिला त्रास देऊ लागतात. व्हिडीओ कुठला आहे हे समजू शकलेलं नाही. पण तरूणी तरूणांसोबत एकटी लढते आणि त्यांना धडा शिकवते. 25 सेकंदाचा हा व्हिडीओ ट्विटरवर 'द फिगेन' नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.
Don't mess with the girl! Hiyaaaaaaaaaaaaaa! 💪💪pic.twitter.com/xZt3rhpiuq
— Figen (@TheFigen) June 11, 2022
या व्हायरल झालेल्या व्हिडीओला आतापर्यंत 35 लाख व्ह्यूज आणि 9 हजारांपेक्षा जास्त रिट्विट मिळाले आहेत. व्हिडीओ पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की, हे सीसीटीव्ही फुटेज आहे. यूजर्सनी तरूणीच्या हिंमतीचं भरभरून कौतुक केलं आहे. लोक वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. काही लोक म्हणाले की, आपल्या मुलांना मुलींचा सन्मान करणं शिकवलं पाहिजे. तेव्हा ही स्थिती दूर होईल.