तुफान राडा! कचोरीसोबत कांदा न दिल्याने 'ती' चिडली; विक्रेत्याची सायकलच पाडली, Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 12:09 PM2021-11-08T12:09:55+5:302021-11-08T12:14:39+5:30
Girl slaps kachodi seller on issue of onion video viral : कचोरीसोबत कांदा मिळाला नाही म्हणून एक तरुणीने धिंगाणा घातल्याची घटना आता समोर आली आहे.
नवी दिल्ली - सोशल मीडियावर सतत नवनवीन व्हिडीओ हे व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. कचोरीसोबत कांदा मिळाला नाही म्हणून एक तरुणीने धिंगाणा घातल्याची घटना आता समोर आली आहे. तिच्या या तुफान राड्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून सर्वत्र त्याचीच चर्चा रंगली आहे. तरुणी गार्डनमध्ये सायकलवर खाद्यपदार्थ विकणाऱ्या एका विक्रेत्याकडे कचोरी खाते. मात्र कचोरी खाताना सोबत कांदा न दिल्याने ते प्रचंड चिडते, विक्रेत्याशी भांडते आणि त्याच्या सायकलला लाथ मारून ती खाली पाडते.
कचोरीसोबत कांदा न दिल्याने तरुणी विक्रेत्याला सुरुवातीला जाब विचारते. पुढे त्याच्याशी यावरून वाद घालण्यास सुरुवात करते. इतकेच नव्हे तर त्याला मारहाणदेखील करत असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तरुणी खाद्यपदार्थ विक्रेत्याकडे कचोरीची मागणी करते. तेव्हा तिला तो कचोरी देतो पण सोबत कांदा देत नाही. प्लेटमध्ये कांदा नाही म्हटल्यावर तरुणी विक्रीदाराला कांदा देण्यात सांगते मात्र तो कांदा संपला आहे असे सांगतो. ते ऐकताच तरुणी खूपच चिडते. रागाच्या भरात त्याला प्रश्न विचारत त्याच्याशी वाद घालू लागते.
Wo stree hai kuch bhi kar sakti hai pic.twitter.com/IyLB45sZzk
— Sarcastic Caravan ™ (@Saffron_Smoke) November 7, 2021
कचोरीसोबत कांदा न दिल्याने तरुणीने घातला धिंगाणा
खाद्य विक्रेता जेव्हा तो तरुणीला समजावत पैसे देण्यास सांगतो तेव्हा तरुणीचा संयम सुटला आणि तिने दुकानदाराच्या सायकलला लाथ मारली. त्यामुळे सायकलवरील दुकानदाराचे सर्व सामान जमिनीवर पडून खराब झाले. त्याचं मोठं नुकसान झाल्याने दुकानदार त्याच्या नुकसानीची भरपाई देण्याबाबत बोलतो तर ती त्यालाच मारहाण करते. तरुणीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून तिला ट्रोल करण्यात येत आहे. हा प्रकार घडला तेव्हा तिथे आणखी देखील काही लोक उपस्थित होते. त्यांनी समजावल्यावर ती लोकांवर देखील चिडलेली पाहायला मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.