अरे व्वा! नोकरीवरून काढलं, पण एका Video ने नशीब फळफळलं; आला ऑफर्सचा महापूर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 11:31 AM2024-03-04T11:31:02+5:302024-03-04T11:38:06+5:30
नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. त्यामुळे ती खूप निराश झाली. पण तिने 1 मिनिट 42 सेकंदाचा एक व्हिडीओ बनवला, ज्याने तिचं नशीबच बदललं.
जगातील लाखो तरुणांप्रमाणे या मुलीलाही नोकरी मिळण्यात अडचणींचा सामना करावा लागला. त्यानंतर तिला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. त्यामुळे ती खूप निराश झाली. पण तिने 1 मिनिट 42 सेकंदाचा एक व्हिडीओ बनवला, ज्याने तिचं नशीबच बदललं. मार्ता प्यूर्टो असं या मुलीचं नाव आहे. सीव्ही तयार करून स्वतःची ओळख करून देण्याऐवजी मार्ता दुसरा मार्ग स्वीकारला.
आपली गोष्ट एका वेगळ्या शैलीत जगासमोर मांडण्याचं तिने ठरवलं. यानंतर स्पेनमध्ये राहणाऱ्या मार्ता ला मुलाखतीसाठी अनेक फोन आले. व्यवसायाने मार्केटिंग मॅनेजर असलेल्या मार्ताने तिचं कौशल्य दाखवण्यासाठी स्वतःचं मार्केटिंग केलं. तिने व्हिडीओ लिंक्डइनवर शेअर केला आहे. ज्याला 88 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.
व्हिडीओमध्ये मार्ता म्हणते की, आता तिला कंपन्यांकडून मुलाखतीसाठी खूप कॉल येत आहेत. त्याला प्लॅटफॉर्मवर 5,000 हून अधिक कनेक्शन रिक्वेस्ट मिळाल्या आहेत. एका मुलाखतीत ती सांगते, 'मला वाटलं होतं की फक्त 100 ते 200 लाईक्स येतील. पण आता मला माझ्या जुन्या नियोक्त्यांकडूनही कनेक्शन रिक्वेस्ट मिळत आहेत, ज्यांनी मला एकदा नाही म्हटलं होतं. पण आता त्यांना मी हवी आहे.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये फिनटेक कंपनी Xolo मधून काढून टाकल्यानंतर, मार्ताने अनेक अर्ज सादर केले, परंतु प्रतिसादात बहुतेक ऑटोमेटेड ईमेल प्राप्त झाले आणि प्रोसेस स्टेजच्या पुढील टप्प्यावर पोहोचणं कठीण झाले. ऑटोमेटेड रिजेक्शनचा भार सतत वाढत होता. मुलाखती चांगल्या दिल्या पण तरी नोकरी मिळणं अशक्य होत होते. यानंतर 29 वर्षीय मार्ताने हा व्हिडीओ शेअर केला आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिलं, 'Met Marta, The Movie.' आता तिला नोकरीचे इतके अर्ज येत आहेत की तिला वेगळा ईमेल आयडी बनवावा लागला आहे.