कोरोनाची धास्ती घेतली अन् मुलीनं कोथिंबीर साबणानं धुतली, पाहा व्हिडिओ...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 06:02 PM2020-06-11T18:02:24+5:302020-06-11T18:08:43+5:30
कोरोनामुळे देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबररदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत.
नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबररदारीचे सर्व उपाय सरकारकडून करण्यात येत आहेत. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मार्च महिन्यापासून देशात लॉकडाऊन करण्यात आला. अशा परिस्थितीत लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. घरात कोणत्याही वस्तू आणण्यापूर्वी त्या वस्तू स्वच्छ केल्या जात आहेत.
दरम्यान, टिकटॉकवर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरस होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. कोरोनाच्या भीतीमुळे एक मुलगी कोथिंबीर साबणाने धूत असल्याचा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक हसत आहेत. तर, काहीजण यावर बरीच टीका करीत आहेत.
कोरोना संकट काळात लोक भाज्या गरम पाण्याने धुवून घेत आहेत, तर या मुलीने भाज्या साबणाने धुतल्या आणि याचा व्हिडीओ तयार करुन टिकटॉकवर अपलोड केला. हा व्हिडीओ टिकटॉकवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दिसून येते की मुलगी साबणाने कोथिंबीर धूत आहे. ती प्रथम कोथिंबीरवर पाणी ओतते आणि साबणाने धुवून घेते.
@1993pikachu इस वायरस ने सबको परेशान किया है 😰 corona ki dehsat ##coronavirus
♬ original sound - 👑 Mehmood J 👑
हा व्हिडिओ गेल्या काही दिवसांपूर्वी शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओला 46 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, 5 हून अधिक कमेंट्स आल्या आहे.
या व्हिडिओला एका युजर्सने मजेशीर कमेंट्स दिली आहे. युजर्सने लिहिले आहे की, 'तुम्ही तिला वॉशिंग मशीनमध्ये घाला. वॉशिंग पावडरने धुतले तर आणखी चांगले साफ होईल'. तर दुसर्या युजर्सने लिहिले की, 'हे पूर्णपणे चुकीचे आहे, यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते.'
दरम्यान, कोरोनामुळे देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून कोरोना रुग्णांचा आकडा हा तब्बल अडीच लाखांवर गेला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबररदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत.
आणखी बातम्या...
कोरोनामुळे परिस्थिती बिघडली; पोटासाठी स्वत:च्या मुलांचे लैंगिक शोषण करतायेत आई-वडील
"काहीही झाले तरी चीनच्या धमक्यांना घाबरणार नाही"
CoronaVirus News : कोरोनाची धास्ती वाढली, गेल्या 24 तासांत 9,996 नवे रुग्ण, 357 जणांचा मृत्यू