बॉयफ्रेंड बर्थ डे सरप्राईज देत नव्हता म्हणून हिने दिली अशी धमकी की बॉयफ्रेंडचा उडाला थरकाप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 11:59 AM2021-08-27T11:59:54+5:302021-08-27T12:01:23+5:30
अनेकींना आपल्याला बॉयफ्रेंडने दर बर्थ डेच्यावेळी काहीतरी हटके करावं असं वाटक असतं. एका गर्लफ्रेंडनेही अशीच मागणी केली आहे. मात्र ती मागणी पूर्ण न झाल्यास ती काय करेल याची धमकीच तिनं दिलीय...
बर्थ डे म्हटलं की आपला बॉयफ्रेंड आपल्याला काय सरप्राईज देणार याबाबत गर्लफ्रेंड उत्सुक असते. अनेकींना आपल्याला बॉयफ्रेंडने दर बर्थ डेच्यावेळी काहीतरी हटके करावं असं वाटक असतं. एका गर्लफ्रेंडनेही अशीच मागणी केली आहे. मात्र ती मागणी पूर्ण न झाल्यास ती काय करेल याची धमकीच तिनं दिलीय...
“Girls are simple, boys make it complex”
— adi 🐺 (@ximpatientwolf) August 22, 2021
Meanwhile girls: pic.twitter.com/WSMlPEpwMO
व्हिडीओत फक्त तरुणीचा चेहरा दिसतो आहे. तिचा बॉयफ्रेंड तिच्यासमोर बसला आहे, त्याचा चेहरा दिसत नाही पण त्याचा आवाज ऐकू येतो आहे.
तरुणी उदास देते आहे. तिचा चेहरा रडवेला झाला आहे. आपल्या बॉयफ्रेंडने आतापर्यंत आपल्या बर्थडेसाठी काहीच खास केलं नाही, याचं दुःख तिला आहे. आधीच्या बर्थडे प्लॅनिंगचा सर्व राग ती त्याच्यावर काढते. बॉयफ्रेंड तिला काय करू असं विचारतो. तेसुद्धा ती सांगत नाही, म्हणजे सर्व मीच सांगायचं का? मी तुझ्या बर्थडेसाठी जे काही करते ते तुला विचारून करते का? असंच ती त्याला विचारते.
बराच वेळ त्यांचा असा वाद सुरू असतो. शेवटी ती बॉयफ्रेंडला धमकी देते. या बर्थडेला तून काही प्लॅन केलं नाहीस तर मी केक कापणार नाही. केक तुझ्या तोंडावरच फेकणार. @ximpatientwolf ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. अनेक नेटीझन्सना तरुणीचं हे वागणं अजिबात आवडलेलं नाही.