गर्लफ्रेंडने किडनी देऊन वाचवला बॉयफ्रेंडचा जीव; ठीक होताच मुलाने धोका देऊन काढला पळ 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 01:23 PM2022-07-07T13:23:29+5:302022-07-07T13:38:26+5:30

बॉयफ्रेंडला किडनी दिल्यामुळे तो पूर्णपणे बरा झाला आणि सात महिन्यांनंतर तो लास वेगासला बॅचलर ट्रिपला गेला.

Girlfriend donates a kidney and saves her boyfriend's life But her boyfriend cheated her | गर्लफ्रेंडने किडनी देऊन वाचवला बॉयफ्रेंडचा जीव; ठीक होताच मुलाने धोका देऊन काढला पळ 

गर्लफ्रेंडने किडनी देऊन वाचवला बॉयफ्रेंडचा जीव; ठीक होताच मुलाने धोका देऊन काढला पळ 

googlenewsNext

नवी दिल्ली: आजच्या धावपळीच्या जगात नाराज लोकांची संख्या मोठी आहे, यामध्ये सर्वाधिक प्रमाण प्रेमवेड्या मंडळीचे पाहायला मिळते. ज्या गर्लफ्रेंडने स्वत:ची किडनी देऊन आपल्या बॉयफ्रेंडचा जीव वाचवला आणि नंतर ठीक होताच त्या मुलाने धोका देऊन तिची फसवणूक केली, याची कल्पना केली तरी अंगावर काटा येतो. मात्र ही सत्य घटना आहे, ही घटना सांगताना गर्लफ्रेंडच्या चेहऱ्यावरील दु:ख पाहून तुम्हालाही रडू येईल. ज्या मुलीने तिच्या शरीरातील एक भाग देऊन त्या मुलाचा जीव वाचवला, तो मुलगा केवळ तिच्यामुळे जिवंत आहे आणि त्याने तिला दगा दिला, याची खूप चर्चा आहे. 

या मुलीचे नाव कोलीन ली (Coleen Lee) असे आहे. जेव्हा त्या मुलीने तिच्या बॉयफ्रेंडसोबत रिलेशनशिपमध्ये होती, तेव्हा त्याला किडनीचा आजार झाला. तिचा बॉयफ्रेंड तिच्यापेक्षा लहान होता आणि वयाच्या केवळ १७ व्या वर्षी त्याला किडनी बदलण्याची गरज भासली. मुलगी त्या मुलाच्या प्रेमात एवढी वेडी झाली होती की ती लगेच त्याला आपडी किडनी द्यायला तयार झाली. मात्र किडनी मिळताच बॉयफ्रेंडने तिची फसवणूक करून पळ काढला. 

बॉयफ्रेंडने दिला धोका

कोलीनने सांगितले की, जेव्हा तिने बॉयफ्रेंडला किडनी दान केली होती, तेव्हा तो मृत्यूशी झुंज देत होता. तिचा बॉयफ्रेंड खूप मोठ्या गंभीर आजाराचा सामना करत होता असे तिने एका 'टॉक शो' दरम्यान सांगितले. जर तिने त्याला किडनी दान केली नसती तर त्याचा कदाचित जीवही गेला असता. यानंतर तिची टेस्ट झाली आणि नंतर खात्री झाली की, ती आपली किडनी देऊ शकते. यानंतर तिने क्षणाचाही विलंब न करता आपली किडनी देण्याचा निर्णय घेतला. कोलीनने सोशल मीडियावर याबाबात माहिती देताना म्हटले की, माझ्या बॉयफ्रेंडला किडनी देऊन मला खूप आनंद झाला कारण त्याला दुसरे जीवन मिळाले. विशेष म्हणजे या दोघांच्या नात्याला फक्त ६ महिने पूर्ण झाले होते. 

बॉयफ्रेंडला किडनी दिल्यामुळे तो पूर्णपणे बरा झाला आणि सात महिन्यांनंतर तो लास वेगासला बॅचलर ट्रिपला गेला. नंतर तो तिथून परतला तेव्हा त्याने सांगितले की, त्याने आणखी एका मुलीसोबत आपण रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगितले. ही गोष्ट कळूनही तिने त्याला एक संधी दिली. मात्र तीन महिन्यानंतर बॉयफ्रेंडने नातं तोडण्याचा निर्णय घेतला आणि प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून कोलीनला ब्लॉक केले आणि तिच्यापासून विभक्त झाला

Web Title: Girlfriend donates a kidney and saves her boyfriend's life But her boyfriend cheated her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.