Girlfriends Prank On Boyfriend: गर्लफ्रेंडला भारी पडला ब्रेकअपचा प्रँक; बॉयफ्रेंडचा रिप्लाय पाहून हवेतच उडाली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 02:17 PM2022-02-02T14:17:50+5:302022-02-02T14:18:05+5:30
Relationship Prank: प्रेयसीने 'ब्रेकअप सॉन्ग' ची लाईन लिहून प्रियकराला मेसेज केला. हा मेसेज वाचून बॉयफ्रेंडही काही वेळ हबकला होता. टॅक्सी पकडून तो तिच्या घरी जाण्यासाठी निघण्याची तयारी करत होता.
एका तरुणीने तिच्या बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअपचा प्रँक केला. तिला तिचा प्रियकर किती प्रेम करते हे पहायचे होते. यासाठी तिने त्याला ब्रेकअप करत असल्याचा मेसेज केला. मात्र, ही गंमत तिच्यावरच उलटली, जेव्हा त्या प्रियकराने तिला सत्य सांगितले. टिकटॉक स्टार असलेल्या या तरुणीने ही गोष्ट सांगितली आहे.
प्रेयसीने 'ब्रेकअप सॉन्ग' ची लाईन लिहून प्रियकराला मेसेज केला. मला दुसरा बॉयफ्रेंड मिळाला आहे, मला माझ्या मार्गाने जायचे आहे. आपल्यातले नाते मला संपवायचे आहे, असे तिने मेसेजमध्ये म्हटले. हा मेसेज वाचून बॉयफ्रेंडही काही वेळ हबकला होता. त्याच्या पायाखालची वाळू सरकली होती. टॅक्सी पकडून तो तिच्या घरी जाण्यासाठी निघण्याची तयारी करत होता.
तेवढ्यात त्याने प्रेयसीला मेसेज करत काय झाले? याचा अर्थ काय? असे विचारले. यावर प्रेयसीने 'हे सांगणे खूप अवघड आहे, पण मला तेच करावे लागेल जे माझ्यासाठी चांगले आहे. मला आता पुढे जायचे आहे.' असे सांगितले. यावेळी बॉयफ्रेंट टॅक्सी बुक करत होता. तेव्हा हा मेसेज आला. यावर बॉयफ्रेंडने तिला '' तुला तिने (दुसऱ्या गर्लफ्रेंडने) मी तुला धोका दिल्याचे सांगितले का?'' असा सवाल केला.
प्रियकराच्या या एका ओळीने तरूणीचे होश उडाले. प्रियकरासोबत ब्रेकअप करण्यावर चेष्टा करणार्या मुलीला त्याच्याकडून दुसर्या मुलीबद्दल ऐकून धक्काच बसला. त्याची चेष्टा करण्याचा डाव अचानक उलटला. मात्र, पुढच्याच क्षणी प्रियकराचा आणखी एक मेसेज मोबाईलवर येऊन धडकला अन त्या तरुणीचा जीव भांड्यात पडला. हा मेसेज होता, कसा वाटला मझा रिव्हर्स प्रँक?. याबाबत या तरुणीने दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये सांगितले आहे.