पोरीने महिंद्रा ७०० चे हिडन फिचर्स सांगितले; Video पाहून आनंद महिंद्रादेखील भिरभिरले...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 06:50 PM2023-04-18T18:50:45+5:302023-04-18T18:51:22+5:30
बऱ्याचजणांनी त्यांना हा व्हिडिओ पाठविल्यानंतर शेवटी महिंद्रांनी त्या तरुणीलाच कंपनीत येण्याचे निमंत्रण दिले आहे.
महिंद्रा आणि महिंद्राने काही वर्षांपूर्वी एक्सयुव्ही ७०० लाँच केली आहे. या एसयुव्हीचे एका सोशल मीडियावरील स्टारने हिडन फिचर्स सांगितले आहेत. हे फिचर्स पाहून आनंद महिंद्रा देखील काही काळ हक्केबक्के झाले होते. बऱ्याचजणांनी त्यांना हा व्हिडिओ पाठविल्यानंतर शेवटी महिंद्रांनी त्या तरुणीलाच कंपनीत येण्याचे निमंत्रण दिले आहे.
आनंद महिंद्रांनी ज्या पोस्टमध्ये व्हिडीओ टाकला आहे तो पाहून तुम्ही हसून हसून बेजार व्हाल असा आहे. एक्सयूवी 700 चा रिव्ह्यू एका तरुणीने गंमतीशीरपणे केला आहे. आरजे पुरखा ( @RJ_Purkhaa) नावाच्या युजरने महिंद्रा एक्सयुव्हीमधील फिचर्सबाबत सांगितले आहे. कारमधील वेगवेगळी टच बटन आणि त्यांचा वापर याबाबत तिने यात सांगितले आहे.
नोकरीचा बायोडाटा पाठवण्यासाठी गाडीतील रेझ्युमे बटण वापरता येते असे तिने म्हटले आहे. सीक बटणावरून सीख कबाब मागवता येतात. एसओएस बटणावरून सॉसचे पाकीट मिळते. कारमधील १, २, ३ बटणे मुलांना अंक शिकविण्यासाठी उपयोगी येतात, असे तिने यात म्हटले आहे. आरजे पुरखाने हा व्हिडिओ मजेशीर पद्धतीने बनवला आहे. आनंद महिंद्रा यांना तिने २२ मार्चला टॅग करत व्हिडिओ पोस्ट केला होता.
सुरुवातीला महिंद्रांनी याकडे दुर्लक्ष केले होते. परंतू बऱ्याच जणांकडून व्हिडीओ मिळाल्यानंतर मात्र त्यांनी यावर रिप्लाय दिला आहे. मला हा व्हिडिओ अनेकदा सापडला आहे. मी या ऑटोमोबाईल तज्ञाला माझ्या डिझाईन स्टुडिओमध्ये आमंत्रित करण्याचा विचार करत आहे. जेणेकरून ती आमच्या भविष्यातील वाहनांसाठी इंटीरियर डिझाइनच्या कल्पना देऊ शकेल, असे आनंद महिंद्रांनी म्हटले आहे.
आता त्यालाही उत्तर नाही देणार ती आरजे कसली. आनंद महिंद्राचे आभार तिने मानले आणि सांगितलेय की मी माझे अनुभव तुमच्यासोबत शेअर करण्यास तयार आहे. ... पहा तो व्हिडीओ...
I must have received this post over a zillion times. I plan to invite this automobile expert @RJ_Purkhaa to our design studio so that she can give us inputs for the interior design of all our future vehicles! 😊 @BosePratappic.twitter.com/tzYvVU0mUC
— anand mahindra (@anandmahindra) April 18, 2023