Viral Video: बकरी अन् मोर यांची झाली तुफान फाईट अन् वातावरण झालं टाईट!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 01:27 PM2022-03-01T13:27:37+5:302022-03-01T16:19:27+5:30

बकरी, मोर दोघंही तसे शांत पण तरी हे दोघांमध्ये लढाई झाली आहे. एरवी शक्यतो कधी लढताना न दिसणारे हा पक्षी आणि प्राणी जेव्हा एकमेकांसमोर उभे ठाकले तेव्हा नेमकं काय झालं हे कॅमेऱ्यात कैद झालं...

goat and peacock started fighting funny video goes viral on internet | Viral Video: बकरी अन् मोर यांची झाली तुफान फाईट अन् वातावरण झालं टाईट!

Viral Video: बकरी अन् मोर यांची झाली तुफान फाईट अन् वातावरण झालं टाईट!

Next

मांजरा-कुत्रा असे पाळीव प्राणी, वाघ-सिंह-बिबट्या असे हिंस्र प्राणी यांची फायटिंग तुम्ही पाहिली असेल. पण कधी एखादा पक्षी आणि प्राण्याची फायटिंग पाहिली आहे का? विशेषत: हा पक्षी मोर आणि प्राणी बकरी असेल तर (Peacock goat fight video). म्हणजे या दोघांना तुम्ही कधी आपसात भिडताना पाहिलं आहे का? तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही. पण मोर आणि शेळीच्या जबरदस्त फायटिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

बकरी, मोर दोघंही तसे शांत पण तरी हे दोघांमध्ये लढाई झाली आहे. एरवी शक्यतो कधी लढताना न दिसणारे हा पक्षी आणि प्राणी जेव्हा एकमेकांसमोर उभे ठाकले तेव्हा नेमकं काय झालं हे कॅमेऱ्यात कैद झालं.

व्हिडीओत पाहू शकता मोर आणि बकरी आमनेसामने आहेत. बकरी अगदी रागात दिसते आहे. सुरुवातीला ती मोरावर हल्ला करते. आपल्या शिंगांनी मोराला मारताना दिसते. त्यावेळी मोर हवेत उडत बकरीच्या वरून दुसऱ्या बाजूला जातो. बकरी पुन्हा मोराला आपल्या डोक्याने मारायला जाते. मोर पुन्हा बकरीच्या पाठीवरून उडत दुसऱ्या बाजूला जातो. बकरी मोराला मारते आणि मोर स्वतःचा बचाव करतो असं बऱ्याच वेळा होतं.

व्हिडीओ पाहताच मजेशीर वाटतो. त्यामुळे ही लढाई पाहून आपल्याला बसू येतं. पण या फनी व्हिडीओतही मोठा संदेश दडलेला आहे. आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. दिपांशू यांनी हा व्हिडीओ पोस्ट करताना त्याला छान कॅप्शनही दिलं आहे. आपल्या सामर्थ्यावर नेहमी विश्वास ठेवा. देवाने सर्वांना अडचणींच्या सामना करण्यायोग्य बनवलं आहे, असं ते म्हणाले.

Web Title: goat and peacock started fighting funny video goes viral on internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.