भुकेलेल्या बकरीने पोट भरण्यासाठी केला भन्नाट जुगाड; आयएफएस अधिकारी म्हणाल्या....
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 06:51 PM2020-06-26T18:51:45+5:302020-06-26T19:04:16+5:30
एका भुकेलेल्या बकरीची उंची झाडांपर्यंत पोहोचत नव्हती, मग पोट कसं भरणार? यासाठी बकरीने भन्नाट जुगाड शोधून काढला आहे.
सोशल मीडियावर सध्या बकरी आणि म्हशीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. लॉकडाऊनकाळात तुम्ही वन्य प्राण्यांच्या मुक्त संचाराचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. भूक लागल्यानंतर तुम्ही सुद्धा कासाविस होत असाल. असाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका भुकेलेल्या बकरीची उंची झाडांपर्यंत पोहोचत नव्हती, मग पोट कसं भरणार? यासाठी बकरीने भन्नाट जुगाड शोधून काढला आहे.
That's a smart goat 😁
— Sudha Ramen IFS 🇮🇳 (@SudhaRamenIFS) June 25, 2020
🎞️ Shared. pic.twitter.com/gy3Do1ugOt
हा व्हिडीओ आयएफअस अधिकारी सुधा रामन यांनी शेअर केला आहे. त्यांनी या व्हिडीओला 'स्मार्ट बकरी' असं कॅप्शन दिलं आहे. तुम्ही पाहू शकता झाडावर उंची पुरत नसल्याने बकरीने म्हशीच्या पाठीचा आधार घेतला आहे. या व्हिडीओतून प्राण्याच्या कल्पनाशक्तीचं दर्शन घडून येतं.
ये भूख है बड़ी!
— PREM DAN RATNU (@PremRatnu) June 25, 2020
हा व्हिडीओ आतापर्यंत ७ हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. ९०० पेक्षा जास्त लाईक्स या फोटोला मिळाले आहेत. तर अनेक कमेंट्स सुद्धा आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत होता. त्या व्हिडीओमध्ये म्हशीचा आणि हत्तीचा खोडकरपणा दिसून आला. आधी ह्त्ती म्हशीला मारण्यासाठी जातो. त्यानंतर म्हैस वैतागून हत्तीच्या मागे रागाने जाते. म्हशीला आपल्या दिशेने येताना पाहताच हत्ती तिथून पळून जातो.
१० वर्षांच्या चिमुरडीची हुशारी पाहून ठोकाल सलाम! अपंग असूनही एका हाताने इतरांसाठी शिवतेय मास्क
चॅलेन्ज! या फोटोत लपली आहे पाल; शोधून शोधून थकाल, बघा जमतंय का?