Gold Price Old Bill: आजोबांची तिजोरी बऱ्याच दिवसांनी उघडली! सोन्याच्या दागिने खरेदीचे जुने बिल सापडले, नातू हमसून हमसून रडला...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 03:41 PM2023-01-21T15:41:05+5:302023-01-21T15:41:28+5:30
अष्टेकर सोनार... काय दिवस होते... आता १० रुपयांत काय येते???
सध्या महागाईने सामान्य होरपळून गेला आहे. हौस, मौज सोडा घरात कडधान्ये, भाज्या आणण्यातच आमदनी संपू लागली आहे. मग अशावेळी ६० हजारांकडे कूच करणारे सोने कुठून खरेदी करायचे, आहे तेच विकायची वेळ आली असताना सोने खरेदीचे एक जुने बिल व्हायरल होत आहे.
५०- ६० वर्षांपूर्वी ज्या किंमतीत फियाट कार यायची त्या किंमतीत आता स्कूटरची दोन चाकेही येत नाहीएत. तेव्हा पेट्रोल ७२ पैसे होते, आता ते १०६ रुपयांवर गेले आहे. ही आहे महागाई. ही महागाई वाढल्यापासून गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जुनी बिले व्हायरल होऊ लागली आहेत. ते पाहून अनेकांच्या डोळ्यात हिशेबाची गणिते तरळू लागली आहेत.
असेच आज एक सोने खरेदीचे बिल आले आहे. हे बिल १९५९सालचे आहे. महत्वाचे म्हणजे त्या काळात खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर सोन्याची तस्करी होत होती. तेव्हा सोने १० रुपये प्रति ग्रॅम होते. आज दहा रुपयांत काय येते म्हणाल तर... तुम्हीच हिशेब घाला.
हे बिल महाराष्ट्रातील एका ज्वेलरीशॉपचे आहे. ६५ वर्षांपूर्वी सोन्याची किंमत ११० रुपये प्रति तोळा होती. म्हणजेच तेव्हा सोने १०-११ रुपये प्रति ग्रॅम मिळायचे. आता त्याची किंमत ५६०० रुपये एवढी प्रचंड आहे. तेव्हा सोने खरेदीदाराचे नाव शिवलिंग आत्माराम होते आमि सोनार मेसर्स वामन निंबाजी अष्टेकर होते. त्यांनी एकूण १०९ रुपयांची सोने, चांदीच्या दागिण्यांची खरेदी केली होती.
सोशल मीडियावर हे बिल व्हायरल होत आहे. चांगले दिवस तेच होते असे युजर्सचे म्हणणे आहे. तर काही युजर्स तेव्हाचे १०० रुपये म्हणजे आताचे ५०००० रुपये असेच होते. तेव्हा लोकांना ५ रुपये पगार होता. पैशांत व्यवहार चालायचे असे म्हणत आहेत. पण काहीही असो १० रुपयांना प्रतिग्रॅम पाहून आताच्या तुमच्या खिशातील पैशांच्या हिशेबाचे गणित डोळ्यांसमोरून नक्कीच गेले असेल.