Viral Video: आता काय म्हणे तर पाणीपुरी शेक! नेटीझन्सनी लावला डोक्याला हात, म्हणाले हा अत्याचार थांबवा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 02:08 PM2022-02-25T14:08:31+5:302022-02-25T14:38:42+5:30

सध्या व्हायरल होत असलेला पाणीपुरीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण हादरून गेला आहे. एका माणसाने पाणीपुरी शेकचा (Panipuri shake) शोध लावला आहे. हे पाहून लोक उलट्या होत असल्याचे म्हणत आहेत.

golgappa shake video goes viral on social media | Viral Video: आता काय म्हणे तर पाणीपुरी शेक! नेटीझन्सनी लावला डोक्याला हात, म्हणाले हा अत्याचार थांबवा

Viral Video: आता काय म्हणे तर पाणीपुरी शेक! नेटीझन्सनी लावला डोक्याला हात, म्हणाले हा अत्याचार थांबवा

Next

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर विचित्र फूड कॉम्बिनेशनशी संबंधित व्हिडिओंचा पूर आला आहे. रस्त्यावरील विक्रेते एखाद्या चांगल्या खाद्यपदार्थांवर असे काही प्रयोग करत आहेत जणू काही देशात लज्जतदार पाककृती तयार करण्याची स्पर्धा सुरू आहे. कधी वडा पाव आईस्क्रीम रोलचा व्हिडिओ, तर कधी मॅगीसोबत पाणीपुरी… यामुळे लोकांचे डोके चक्रावले आहे.

याच प्रकारामध्ये सध्या व्हायरल होत असलेला पाणीपुरीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण हादरून गेला आहे. एका माणसाने पाणीपुरी शेकचा (Panipuri shake) शोध लावला आहे. हे पाहून लोक उलट्या होत असल्याचे म्हणत आहेत. व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओमध्ये (Video) तुम्ही पाहू शकता, की एक विक्रेता गोलगप्पा शेक म्हणजेच पाणीपुरीचा शेक बनवताना दिसत आहे. ही व्यक्ती आधी मिक्सरच्या भांड्यात काही पाणीपुरी टाकते. यानंतर, त्यात उकडलेले बटाटे, आंबट आणि गोड पाणी घालून त्याचा शेक तयार करते. यानंतर ते ग्लासमध्ये ओतून त्यावर पाणीपुरी पावडरने सजवते आणि सर्व्ह करते.

ही अजब रेसिपी पाहून तुम्हालाही क्षणभर काय करावे, ते कळणार नाही. या विचित्र पाणीपुरी शेकचा व्हिडिओ Instagram या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर foodie_blest नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. यूझरने कॅप्शनमध्ये लिहिले, की ‘क्या लगता है, कैसा होगा?’ ९ फेब्रुवारीला शेअर केलेला हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. आतापर्यंत ७ हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाइक केले आहे. मात्र, हा व्हिडिओ पाहून सर्वजण विक्रेत्याला झापत आहेत.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक विक्रेत्यावर आपला राग काढत आहेत. एका यूझरने कमेंट करताना लिहिले आहे, की उलटी होण्यासाठी पिशवी द्याल नाहीतर आम्हाला सोबत आणावी लागेल. त्याचवेळी दुसरा यूझर म्हणतो, की हे पाहिल्यानंतर मला उलट्या झाल्या. त्याचप्रमाणे आणखी एका यूझरने कमेंट करताना लिहिले आहे, की विक्रेते काहीही करत आहेत, अशाना हाकलून द्या.

Web Title: golgappa shake video goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.