संतापजनक! सरकारी शाळेतील मुलांना लावलं जातयं झाडू अन् भांडी घासायचं काम; व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 06:32 PM2021-03-18T18:32:27+5:302021-03-18T18:39:37+5:30
Trending Viral News in Marathi : या फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता सरकारी शाळेतील मुलांना झाडू मारायला लावलं जात आहे. तर काही मुलं भांडी घासताना दिसून येत आहेत.
सरकारी शाळेतील अवस्था याबाबत काही वेगळं सांगायला नको. तरिही अनेक राज्यांमध्ये शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान उत्तरप्रदेशातील हापूड येथिल एक संतापजनक घटना व्हायरल होत आहे. हे व्हायरल फोटो पाहून तुम्हालाही संताप अनावर होईल. या फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता सरकारी शाळेतील मुलांना झाडू मारायला लावलं जात आहे. तर काही मुलं भांडी घासताना दिसून येत आहेत. हा व्हिडीओ जनपद हापूडच्या शाळेमधील असल्याचं सांगितलं जात आहे.
योगी सरकार सरकारी शाळेतील स्थिती सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करताना दिसून येत आहे. पण शिक्षण विभागातील काही लोकांकडून या प्रयत्नाांवर पाणी फिरवलं जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काही शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारायला सांगितला जात आहे. इतकंच नाही तर वर्गाच्या बाहेर भांडी घासायला सुद्धा पाठवलं जात आहे.
बापरे! वेळेच्या २ मिनिटं आधीच ऑफिस सोडलं म्हणून सरकारी कामगाराचा कापला पगार अन्.
व्हायरल झालेल्या या फोटोंमुळे गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक छोटीशी विद्यार्थिनी हातात झाडू घेऊन वर्गात झाडू मारत आहे. तर दोन मुलं वर्गाच्या बाहेर ताट, तांब्या अशी ४-५ भांडी धूत आहेत. या मुलांचे वय सहा ते आठ वर्षादरम्यान असल्याचं सांगितलं जात आहे. जेव्हा मुलांना या कामाबाबत विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनी शिक्षकांनी काम सांगितल्याची माहिती देत अंजू मॅडम यांचे नाव घेतलं.
'ही' तरूणी आहे लेडी 'गजनी', गर्लफ्रेन्ड आणि परिवाराचीही तिला राहत नाही आठवण!
फोटो व्हायरल झाल्यानंतर या मुलांचे आई वडील संतापले असून आता शिक्षकांना धारेवर धरलं जात आहे. या प्रकरणाबाबत शिक्षण अधिकारी अर्चना गुप्ता यांनी या प्रकरणाचा पूर्ण तपास करून दोषींवर कारवाई केली जाईल असं म्हटलं आहे. आता शिक्षण विभागाकडून कोणतं पाऊल उचललं जातं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.