सोशल मीडियावर हॉट व्हिडीओ पोस्ट करणं शिक्षिकेला पडलं महागात! गमवावी लागली नोकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 10:25 PM2021-12-08T22:25:04+5:302021-12-08T22:26:03+5:30
Victoria Casillina : शाळेतील शिक्षिकेचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ती बेडरूममध्ये कपडे काढताना दिसत आहे.
नवी दिल्ली : एका शिक्षिकेला सोशल मीडियावर आपला व्हिडीओ शेअर करणे चांगलेच महागात पडले आहे. रशियातील या 23 वर्षीय शिक्षिकेचा असा व्हिडिओ व्हायरल झाला की, आता तिला याप्रकरणी नोकरी गमवावी लागली आहे. दरम्यान, या शाळेतील शिक्षिकेचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ती बेडरूममध्ये कपडे काढताना दिसत आहे.
'डेली स्टार'च्या वृत्तानुसार, व्हिक्टोरिया काशिरीना या शिक्षिकेने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला होता. शाळेतून आल्यावर ती आधी कोट काढते, मग हळू हळू ती सर्व कपडे काढू लागते. यादरम्यान ती अतिशय अश्लील पोजही देत आहे, असे या व्हिडिओमध्ये दिसून येते. हा स्ट्रिप डान्सचा व्हिडिओ पाहिल्यानंतर काशिरीनाच्या आई-वडिलांनी तिला खूप फटकारले. पण, जेव्हा हा व्हिडिओ शाळेतील लोकांपर्यंत पोहोचला तेव्हा त्यांनी याला अत्यंत लाजिरवाणे कृत्य असल्याचे म्हटले. याचा वाईट परिणाम शाळेतील मुलांवर होईल, असे शाळा प्रशासनाने म्हटले आहे.
यावर एका विद्यार्थ्याच्या आईने सांगितले की, "कृपया असे अश्लील व्हिडिओ पोस्ट करू नका किंवा तुमचे सोशल मीडिया बंद करा. त्यासाठी तुम्हाला लोकप्रियता मिळत असली तरीही. माझ्या मुलीनेही हा व्हिडिओ पाहिला आणि त्याच्यावर याचा वाईट परिणाम होऊ शकतो." दुसर्या विद्यार्थ्याच्या पालकांनी व्हिडिओवर आक्षेप घेत म्हटले की, " एक शिक्षिका म्हणून हे सर्व करणे तुम्हाला शोभत नाही. हे पाहून मुलांना काय वाटेल?"
याचबरोबर, शाळेतील एका शिक्षकाने सांगितले की, "तुम्हाला अशी कृत्ये करायची असतील, तर ती सोशल मीडियावर टाकू नका. तसेच, सर्व मुलांना ब्लॉक केले पाहिजे, जेणेकरून ते हा व्हिडिओ पाहू शकत नाहीत." याशिवाय, शिक्षकांनी काशिरीनाच्या आईला सल्ला दिला की, तिने आपल्या मुलीच्या या कृत्यांवर लक्ष ठेवावे.
दुसरीकडे, याबाबत काशिरीना म्हणाली की, तिने असे कोणतेही चुकीचे काम केलेले नाही. गेल्या अनेक वर्षांपासून ती पोल डान्स करत आहे आणि त्याचा व्हिडिओ बनवण्याचे त्याचे खूप जुने स्वप्न होते. तसेच, जेव्हा एका विद्यार्थिनीच्या आईने माझे अकाउंट डिलीट करण्यास सांगितले, तेव्हा मी फक्त त्या महिलेला आणि तिच्या मुलीला ब्लॉक केले, असे काशिरीनाने म्हटले आहे.
दरम्यान, ज्यावेळी शाळेच्या संचालकांनी काशिरीनाला तो व्हिडिओ डिलीट करण्यास सांगितले. त्यावर तिने नकार दिला. त्यानंतर शाळेचे संचालक म्हणाले, "माझी स्वतःची दोन मुले आहेत आणि मला वाटते की मुलांच्या पालकांनी योग्य गोष्ट केली आहे. तुम्हाला व्हिडिओ हटवायचाही नाही. त्यामुळे आम्ही तुम्हाला नोकरीवरून काढण्याचा निर्णय घेतला आहे."